Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ८ लाखांची देणगी; हैदराबादच्या ‘अजसरा होम्स’च्या वतीने दानशूर भक्ताचे मोठे योगदान!

श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ८ लाखांची देणगी; हैदराबादच्या ‘अजसरा होम्स’च्या वतीने दानशूर भक्ताचे मोठे योगदान!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी हैदराबाद येथील दानशूर भक्त एन. रामकृष्ण राव यांनी तब्बल आठ लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. आपल्या ‘अजसरा होम्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या वतीने ही देणगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली.

​एन. रामकृष्ण राव यांनी श्री तुळजाभवानी देवीचे भावपूर्ण दर्शन घेऊन आरती केली. याप्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन यथोचित नागरी सत्कार करण्यात आला.

​हा सत्कार मंदिर संस्थानचे लेखाधिकारी संतोष भेंकी आणि सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमास लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी दिनेश निकवाडे, तेजस कऱ्हाळे यांच्यासह मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india