तुळजापुरात उद्या भव्य मोफत महाआरोग्य शिबिर; ७० ते ८० तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती, मोफत औषधे व शस्त्रक्रियांचा लाभ घेण्याचे आवाहन!
तुळजापूर प्रतिनिधी:-
तुळजापूर शहरामध्ये मृणाली फाउंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, शिवसेना डॉक्टर सेल (महाराष्ट्र राज्य), पवन राजे फाउंडेशन आणि आरोग्य विभाग तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य-दिव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तुळजाभवानी पुजारी मंडळ येथे पार पडणार असून या संदर्भातील सविस्तर माहिती ऋषिकेश (भैया) मगर शिवसेना डॉक्टर सेलचे तालुका प्रमुख डॉ. राजेश पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
खासदार श्रीकांत शिंदे आणि मान्यवरांच्या प्रेरणेतून आयोजन-
खासदार श्री. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून, खासदार ओमराजे, हृषीकेश (भैया ) मगर आणि शिवसेना डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष धनंजयजी पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली व आग्रहाखातर या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराची मुख्य वैशिष्ट्ये आणि उपलब्ध मोफत सेवा-
७० ते ८० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम- या शिबिरासाठी विविध आजारांवरील ७० ते ८० निष्णात व तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सर्व आजारांवर मोफत उपचार: पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंतच्या सर्व आजारांचे मोफत निदान, तपासणी, औषध उपचार आणि शस्त्रक्रिया पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महिला आरोग्यावर विशेष लक्ष- तुळजापुरात महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याच्या उद्देशाने ३ विशेष स्त्रीरोग तज्ज्ञांची (Gynecologists) नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी महिलांसाठी पॅप स्मिअर (Pap Smear) सह इतर कठीण तपासण्या मोफत केल्या जातील.
चष्मा व औषध वितरण- डोळ्यांची तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाईल, तसेच मोफत औषधांची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
गंभीर आजारांवर मोफत उपचार- हृदयविकाराशी संबंधित एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, त्वचारोग (Skin diseases), लहान मुलांचे आजार व इतर गंभीर आजारांवर मोफत उपचार व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.
तरी जास्तीत- जास्त नागरिकांना आणि भाविकांना उपस्थित राहण्याचे व शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन-
ऋषिकेश (भैय्या) मगर आणि डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, तुळजापूर परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध विषयांचे तज्ज्ञ एकत्र येऊन मोफत आरोग्य सेवा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. नागरिकांनी, महिलांनी व भाविकांनी आपल्या जुन्या वैद्यकीय तपासण्यांचे रिपोर्ट (Reports) सोबत आणून या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.







