तुरोरी येथील पत्रकार बालाजी माणिकवार यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा धाराशिव जिल्हाध्यक्ष पदि बिनविरोध निवड .
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
दि .03महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा कार्यकारी मंडळाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवड प्रक्रियेत तुरोरी येथील पत्रकार बालाजी माणिकवार यांची बिनविरोध जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उमरगा येथील अशा मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.02) सायंकाळी सात वाजता तुरोरी,उमरगा व धाराशिव येथील आर्य वैश्य समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष तुकाराम माणिकवार होते,तर महासभेचे प्रदेश संपर्क प्रमुख प्रदिप कोकडवार प्रदेश सहसचिव गोविंद देवडवार ,बांधकाम समितीचे तांत्रिक संचालक डॉ बालाजी कमठाणे ,बांधकाम समितीचे संचालक मनेष माणिकवार,प्रकाश चिद्रेवार, गोविंद देवशटवार, व्यंकटेश रघोजी, नंदकुमार मुक्कावार, बाबुराव गौरशेट्टी, राजेंद्र केशवशेट्टी, अशोक माणिकवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महासभेच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी बालाजी व्यंकटराव माणिकवार, कोषाध्यक्षपदी साईनाथ गौरशेट्टी, जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष गौरशेट्टी आणि प्रकाश चिद्रेवार यांच्या निवडी करण्यात आल्या.
महासभेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, समाज संघटन मजबूत करणे, युवकांना संघटित करणे तसेच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले बालाजी माणिकवार यांची समाजाशी असलेली नाळ आणि जनसंपर्क लक्षात घेऊन त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
समाजातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.नूतन जिल्हाध्यक्ष बालाजी माणिकवार यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या पदाधिकाऱ्यांसह समाजबांधवांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. “एकता, संघटन आणि विकास” या भूमिकेतून महासभेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






