तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे दुष्काळ निवारणासाठी शेतकरी बांधवासोबत संवाद बैठक.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.४) रोजी तुळजापूर तालुक्यातील मौजे काटगाव येथे शेतकरी बांधवांसोबत संवाद बैठक घेऊन दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा शरण पाटिल यांनी केली .
यावेळी शेतकरी बांधवांच्या समस्या, त्यांच्या अडचणी तसेच शेतीशी संबंधित विविध विषय जाणून घेतले. तसेच शिवारात जाऊन सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पिकांच्या सद्य्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेतीचे नुकसान कमी व्हावे आणि दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविता याव्यात, यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे.
याकरिता शेतकरी बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, तसेच त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी सल्याचे शरण पाटील बोलताना व्यक्त केले.
यावेळी तुळजापूर पंचायत समितीचे सभापती संतोष दादा बोबडे,तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील,उमरगा पंचायत समिती माजी सभापती सचिन पाटील, धाराशिव जिल्हा परिषद माजी सभापती पंडित मामा जोकार, पंचायत समिती सदस्य सज्जन मामा सोळुंके, माजी सरपंच अशोक माळी, कमलाकर पाटील, दादासाहेब घोडके, भागवत जोकार, लक्ष्मण बचाटे, शिवराज पाटील बाबा घोडके,प्रल्हाद काळे,अनिल सगर, माजी नगरसेवक महेश माशाळकर, आकाश इंगळे, अमर भोसगे, सुजित शेळके,राजूभाई मुल्ला यांच्यासह शेतकरी बांधव व स्थानिक पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.









