Best News Portal Development Company In India

मुरुम येथे रोटरी क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अवार्ड, गणेश मंडळ पुरस्कार व सायकलचे वितरण….

मुरुम येथे रोटरी क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अवार्ड, गणेश मंडळ पुरस्कार व सायकलचे वितरण….

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

रोटरी क्लब मुरुम सिटीच्या वतीने मुरुम येथील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि.३) ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’, उत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार आणि गरजू विद्यार्थींना सायकल वाटप सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

​मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ते योजनेचे सहअध्यक्ष शरण पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी लातूर येथील विभागीय शिक्षण मंडळाचे सहाय्यक उपसंचालक संजय पंचगल्ले, मुरूम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गव्हाणे, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, रोटरीचे अध्यक्ष कल्लय्या स्वामी, मुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, सचिव प्रकाश रोडगे, सहशिक्षक संदीप रोकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि कुंडीतील रोपट्याला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले.

​​या सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींमध्ये ​रोटरी आत्मनिर्भर पुरस्कार २०२५ गुंडू पुराणे (व्यावसायिक), ​रोटरी सक्षम पुरस्कार (दिव्यांग कार्य) सहदेव बोडरे, ​नेशन बिल्डर अवॉर्ड -२०२६ (आदर्श शिक्षक) काशिनाथ सातलगावकर (नाईक नगर), महादेव गायकवाड (भोसगा), सोनाली कलशेट्टी (मुरूम), श्रीकांत कनकधर (वरनाळवाडी), सोमनाथ चीनगुंडे (करवंजी), विनोद भोजने (बोळेगाव), गुंडू पवार (दाळिंब), सतीश जाधव (अचलेर), उमाकांत महामुनी (मुरूम), प्रा. डॉ. अप्पासाहेब सूर्यवंशी (मुरूम), गणेशोत्सवादरम्यान सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांमध्ये मुरूम येथील किसान गणेश मंडळ (प्रथम), यशवंत गणेश मंडळ (द्वितीय), शंकर गणेश मंडळ (तृतीय) तर ​शिक्षणात आणि प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी रोटरी क्लबच्या वतीने गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

यामध्ये आदिती उजने (बेनीतुरा, इयत्ता ५ वी), वैष्णवी जाधव (काटेवाडी, इयत्ता ५ वी), मोहिनी गायकवाड (भुयार चिंचोली, इयत्ता ७ वी), सुवानी अचलेरे (कंटेकुर, इयत्ता ६ वी), पायल चिंचोळे (बेळंब, इयत्ता ६ वी) या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकली वितरित करण्यात आल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गव्हाणे व सहशिक्षक श्रीकांत कनकधर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
​
चौकट : ​शिक्षकांचा सन्मान गौरवाची बाब…संजय पंचगल्ले

सहाय्यक उपसंचालक संजय पंचगल्ले म्हणाले की, समाजसेवेचे व्रत घेतलेल्या शिक्षकांचा रोटरीच्या वतीने सन्मान होणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. शिक्षकांनी आपले व्रत पवित्र भावनेने जोपासून समाजसेवा केली पाहिजे. सेवा हेच कर्म मानून सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सातत्याने उपक्रम राबवले पाहिजेत.
​शरण फाउंडेशन नेहमीच मदत करेल… शरण पाटील.

अध्यक्षीय समारोप करताना शरण पाटील यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर काम करणारी रोटरी इंटरनॅशनल ही निष्काम सेवाभावी संस्था म्हणून जगभर परिचित आहे. या संस्थेला शरण पाटील फाउंडेशन नेहमीच मदत करत राहील. मानव सेवेचे व्रत घेऊनच पुढील काळातही कार्य केले जाईल.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्लय्या स्वामी यांनी केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. त्रिंबक व्हटकर, सुनील राठोड, प्रा. भूषण पाताळे, मल्लिकार्जुन बदोले, कल्लाप्पा पाटील, बाबासाहेब पाटील, शिवशरण वरनाळे, ॲड. अमर पवार, शिवानंद स्वामी, शिवानंद पाटील, शरणाप्पा धुम्मा आदींनी विशेष पुढाकार घेतला.

सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी तर आभार उल्हास घुरघुरे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, शिक्षण प्रेमी, गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india