*पंचशील बुद्ध विहार बेडगा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक १६ चे उदघाटन*
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
(दि. ५ )भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा उमरगा अतर्गत बिएसआय २५ मिशन अतर्गत ५६ग्रामशाखा स्थापन करण्याच्या राष्ट्रीय कार्यध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भिमराव आबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बेडगा येथे भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचशील बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा १६ चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते करून त्रिशरण पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले,या वेळी तालुका सरचिटणीस सगीता सोनकांबळे तालुका उपाध्यक्ष प्रा. शिवराम आडसुळे, तालुका सचिव धिरज काबळे याची प्रमुख उपस्थिती होती.
तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांनी ग्राम शाखेचे उद्घाटन करून पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा क्रमांक १६ शाखाध्यक्ष सुनील कांबळे, सरचिटणीस राधिका कांबळे, कोषाध्यक्ष शोभा कांबळे, उपाध्यक्ष संरक्षण विभाग अमोल कांबळे, उपाध्यक्ष संस्कार विभाग लिंबराज कांबळे, उपाध्यक्ष पर्यटन विभाग निवृत्ती कांबळे, उपाध्यक्ष महिला विभाग सुकुमार बाई कांबळे, संरक्षण सचिव संगीता कांबळे, संस्कार सचिव सुनिता कांबळे, पर्यटन सचिव ललिता कांबळे, महिला सचिव सुमन कांबळे, संघटक अनिता कांबळे, शिलाबाई भालेराव, हारुबाई कांबळे, नामदेव कांबळे, मुकुंद कांबळे मुकुंद कांबळे, विजा कांबळे, गुंडू कांबळे, नंदाबाई शिंदे, धम्म शिला कांबळे, अनिकेत कांबळे, शिलाबाई कांबळे, सतीश कांबळे, आदी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
तसेच नूतन पदाधिकारी यांना तालुका शाखेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भीम नगर येथील सर्व बौद्धउपासक-उपासिका तसेच सर्व लहान बालक-बालिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. ग्राम शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमन काबळे यांनी केले तर आभार सुनिल काबळे यांनी मानले.






