Best News Portal Development Company In India

जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलचे वर्चस्व!

जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलचे वर्चस्व!

१७, १९ वर्षांखालील मुले व १७ वर्षांखालील मुलींच्या तीन संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
दि. ५ ऑक्टोबर २०२६ : उमरगा येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. १७ वर्षांखालील मुले, १९ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुली या तीन संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिल्हा परिषद हायस्कूल मैदान, उमरगा येथे दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल २४ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू रणजीत राजपूत, क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार, शिक्षण केंद्रप्रमुख शीला मुदगडे, पत्रकार लक्ष्मण पवार आणि धाराशिव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव महंमदरफी शेख यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुले व मुली तसेच १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज देत उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये १७ वर्षांखालील मुले, १९ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुलींच्या संघांनी विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच अक्षय ढेंगळे, कुणाल राठोड आणि आदित्य मंदे यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

धाराशिव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव तथा क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील रोहित पवार, आदित्य सगर, अर्जुन गायकवाड, आदित्य पांडे, स्वप्निल राठोड, आर्यन कांबळे, उस्मान जमादार, शिवदर्शन शिंदे, कल्लप्पा पवार, उदयराज सगर, इस्माईल नदाफ, विठ्ठल पवार, विश्वजीत मेढेबने, अंकुश इंगळे, पृथ्वीराज पालमपल्ले, अशोक वजनम, अंश अबाचणे, लक्ष्मण माने आणि निखिल शिंदे स्वरा गायकवाड अस्मिता भोसले वैष्णवी कोळनुरे प्रीती मेढे सृष्टी कोळनुरे प्रमिला जाधव अनोखी एरंडे आफिया उस्ताद वैष्णवी वरवटे अर्चना अंबुलगे गीता गायकवाड यांच्यासह विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यशस्वी विद्यार्थ्यांना कोच राजू सरपे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शकुंतला मोरे, गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, केंद्रप्रमुख शीला मुदगडे, शिक्षणतज्ज्ञ सदानंद शिवदे, अशोक पतगे, सुजाता मोरे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हास्तरीय स्पर्धेत तीन संघांची विभागीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रयत्न, विद्यार्थ्यांची मेहनत आणि मार्गदर्शकांचे योगदान यांचे फलित असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india