Best News Portal Development Company In India

LCB ची धडक कारवाई: येरमाळा, वाशी परिसरातील पवनचक्कीच्या तारा चोरीचा पर्दाफाश; ११.५३ लाखांच्या मुद्देमालासह ६ आरोपी जाळ्यात!

LCB ची धडक कारवाई: येरमाळा, वाशी परिसरातील पवनचक्कीच्या तारा चोरीचा पर्दाफाश; ११.५३ लाखांच्या मुद्देमालासह ६ आरोपी जाळ्यात!

​नळदुर्ग दरोड्यांतील फरार आरोपीसह चोरीचा माल घेणारा भंगार व्यावसायिकही गजाआड; एलसीबीच्या धाडसी कारवाईत ४ गुन्हे उघडकीस.

​तुळजापूर प्रतिनिधी:-
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पवनचक्कीच्या नवीन पोलवरून वीज वहन करणाऱ्या ॲल्युमिनियम व तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मांडवा शिवारात टाकलेल्या धाडसी छाप्यात पोलिसांनी ५ चोरट्यांसह माल खरेदी करणाऱ्या एका व्यापाऱ्याला अटक केली असून, त्यांच्याकडून ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​अशी झाली कारवाई

​दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गस्त घालत असताना, मांडवा शिवारात शाम अजिनाथ शिंदे व त्याचे साथीदार पवनचक्कीवरून चोरलेल्या ॲल्युमिनियम तारा एका पिकअपमध्ये भरत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

​माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक पिकअप व दोन मोटारसायकली उभ्या असल्याचे आणि ८ ते १० जण तारांचे बंडल पिकअपमध्ये टाकत असल्याचे दिसले. पोलिसांनी सावधगिरीने पायी जात वेढा घातला. पोलिसांना पाहताच आरोपी पळू लागले, मात्र पथकाने पाठलाग करून ५ जणांना शिताफीने पकडले, तर ४ जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

​अटक करण्यात आलेले आरोपी
​१. शाम अजिनाथ शिंदे (वय २६, रा. मांडवा) – (नळदुर्ग येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी)
२. लाला गोविंद पवार (वय २४, रा. जुनी दूध डेअरी, धाराशिव, ह.मु. मांडवा)
३. आकाश श्रीरंग पवार (रा. वरूडा, ता. जि. धाराशिव)
४. पवन कालिदास काळे (वय २२, रा. वरूडा, ता. जि. धाराशिव)
५. अंगद प्रल्हाद शिंदे (वय ३२, रा. घोसापुरी, ता. जि. बीड – पिकअप चालक)
६. जाकेर निजाम शेख (रा. धाराशिव – चोरीचा माल खरेदी करणारा)

​चोरीचा माल घेणारा व्यावसायिकही गजाआड
​पकडलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी तेरखेडे, इंदापूर आणि ढोकी शिवारातील पवनचक्कीच्या नवीन पोलवरून वायर कट करून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी आकाश पवार याने चोरलेल्या तारा धाराशिव येथील भंगार विक्रेता जाकेर निजाम शेख याला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने धाराशिव येथे जाऊन जाकेर शेख याला ताब्यात घेतले. त्याने चोरीचा माल घेतल्याची कबुली दिली आहे.

​जप्त मुद्देमाल व उघडकीस आलेले गुन्हे
​या कारवाईत येरमाळा पोलीस ठाण्यातील ४ गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
​तांब्याची व ॲल्युमिनियमची तार
​१ पिकअप गाडी
​२ मोटारसायकली
(एकूण जप्त मुद्देमाल: ₹११,५३,०००/-)
​तपास पथक

​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
​कारवाई करणारे पथक:
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर; क्यूआरटी पथकातील आदित्य बालवाड, रितेश चारले, महेश खरात; चालक पोलीस अंमलदार महेबूब अरब, सुभाष चौरे, रोहित दंडनाईक व प्रकाश बोईनवाड.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india