उमरगा तालुक्यात आमदार बसवराज पाटील यांनी केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
धाराशिव जिल्ह्यातील नाईचाकूर,बोरी,सावळसूर ता.उमरगा येथे दुष्काळग्रस्त भागाची विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
शिवारात फिरून पिकांची अवस्था, पाण्याची उपलब्धता आणि दुष्काळामुळे बळीराजासमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा आढावा घेतला.
पिकांचे झालेले नुकसान, पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच आगामी हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसमोरील अडचणी जाणून घेतल्या.शेतकऱ्यांना पाणी, चारा आणि आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकरी एकटा नाही; त्याच्या प्रत्येक अडचणीत त्याच्या पाठीशी देवाभाऊंचे महायुती सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगून बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पाटील म्हणाले.
यावेळी नाईचाकूर येथील विजयकुमार सोनवणे, केशवराव पवार, रावसाहेब पवार, डॉ. दिलीप गरुड माणिक बापू पवार, सुरेश बाबळसुरे, शिवाजी पवार, सतीश पवार, राजेंद्र डिगोळे, रामभाऊ पवार, शरद पवार, कांत पवार, सतीश पाटील, ओम प्रकाश पवार, पांडुरंग पवार, रामभाऊ घाटे, भाऊराव कांबळे, बाबू कांबळे, कमलाकर मकाळे, चंद्रकांत स्वामी सरपंच, रूपमांगत पवार,भीमाशंकर पवार.बोरी येथील उपसरपंच विक्रम मदने,शिवाजीआबा फत्तेपुरे,विजयकुमार कांबळे, अभिजीत इंगळे, हरिभाऊ कांबळे, तानाजी खटके, शिवामाय होळकर, शिवाजी सूर्यवंशी, प्रकाशअण्णा मदने, संतोष फत्तेपूर, संतराम इंगळे, नितीन इंगळे, भरत मदने, सावळसुर येथील आकाश इंगळे, प्रेमनाथ सूर्यवंशी, भालचंद्र बिराजदार,बाळू मशाळ,ज्ञानेश्वर पाटील,शाम चिंचोळे,अविनाश सूर्यवंशी, गुंडू बिराजदार,संदीप पाटील,दिनकर सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.








