Best News Portal Development Company In India

दुधनाळा पाटीजवळून लाखाची युनिकॉर्न दुचाकी लांबवली; उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल!

दुधनाळा पाटीजवळून लाखाची युनिकॉर्न दुचाकी लांबवली; उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल!

​तुळजापुर प्रतिनिधी:-
दुधनाळा पाटीजवळ रस्त्याच्या कडेला पार्क केलेली १ लाख रुपये किमतीची ‘हॉन्डा युनिकॉर्न’ मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा (जि. लातूर) तालुक्यातील हंद्राळ येथील रहिवासी मारुती अर्जुन कोळेकर (वय ३८) यांची १,००,००० रुपये किमतीची युनिकॉर्न मोटरसायकल (क्र. MH 24 CC 3207) ही ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० ते ७:४५ वाजेच्या सुमारास दुधनाळा पाटीपासून पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर उभी होती. यादरम्यान अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.

​गाडीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने मारुती कोळेकर यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिलेल्या प्रथम खबरेवरून उमरगा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india