Best News Portal Development Company In India

बोरदणवाडी पाटीजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ६० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, पती गंभीर जखमी!

बोरदणवाडी पाटीजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ६० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, पती गंभीर जखमी!
​
तुळजापूर प्रतिनिधी:-
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरदणवाडी पाटीच्या वळणावर एका भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील वृद्ध महिलेचा गंभीर जखमी होऊन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत.
​
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील गणेश नगरचे रहिवासी जब्बार अब्दुल शेख (वय ६७ वर्ष) हे त्यांची पत्नी खतीजा जब्बार शेख (वय ६० वर्ष) यांच्यासह दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी ५:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच २५ ए.बी. ८१२३) जात होते. बोरदणवाडी पाटीच्या पुढे असलेल्या वळणावर आले असता, पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहन चालकाने आपले वाहन अत्यंत हायगयीने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
​
या अपघातात खतीजा शेख यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर जब्बार शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.

​नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल.
उपचारानंतर जखमी जब्बार शेख यांनी दि. ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६(१), १२५(ए)(बी) सह मोटार वाहन कायदा (MVA) कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india