Best News Portal Development Company In India

युवा वारकरी लखन चव्हाण यांचे दु:खद निधन!

युवा वारकरी लखन चव्हाण यांचे दु:खद निधन

————————————————–

वागदरी(एस. के.गायकवाड ):

 

वागदरी ता.तुळजापूर येथील वारकरी सांप्रदायिक चळवळीतील युवा वारकरी मृदंगाचार्य व अभंग गायक रुपेश नागनाथ चव्हाण उर्फ लखन (बंटी) यांचे दि.o६ आक्टोबर २o२६ रोजी दुपारी ठिक ३.३० वा. दरम्यान सर्प दंशाने दुर्दैवी दु:खद निधन झाले आहे.

 

रुपेश चव्हाण यानी पदवी शिक्षण पूर्ण करून शेती व्यवसायात आपल्या वडीलाना मदत करत वारकरी सांप्रदायील चळवळीत चक्रिय झाले होते. एक उत्कृष्ठ युवा मृदंग वादक म्हणून त्यानी अल्पावधितच आपली ओळख निर्माण केली होती. दि.५ ऑक्टोबर २o२६ राजी रात्री अक्कलकोट तालूक्यातील मौजे किणी या गावी आयोजित भजन किर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली सेवा दिली होती.

 

दि.०६ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास वागदरी शिवारातील आपल्या शेतात झाडाखाली झोपले असता विषारी नाग सापाने त्याना चावा घेतला. उपचारासाठी सोलापूर येथील शाराकीय रुग्नालयात दाखल करण्यात आले होते.उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदाय चळवळीतील एक उमलता युवा वारकरी काळच्या पडद्याआड झाला आहे.मृत्यू समई त्यांचे वय अंदाजे २२ वर्षे होते.

 

त्यांच्या पश्चान आई वडिल आजी एक भाऊ, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि.७ ऑक्टोबर वार बुधवार रोजी सकाळी ठिक १०.३० वा. दरम्यान वागदरी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

. त्यांच्या दुःखद निधना बद्यल त्याना भावपूर्ण श्रध्दांजली

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india