Best News Portal Development Company In India

तुळजापुरात नवरात्रोत्सवासाठी भाविकांची मांदियाळी: श्री तुळजाभवानी मातेच्या चरणतीर्थाच्या वेळेत बदल; पाहा नवी वेळ!

तुळजापुरात नवरात्रोत्सवासाठी भाविकांची मांदियाळी: श्री तुळजाभवानी मातेच्या चरणतीर्थाच्या वेळेत बदल; पाहा नवी वेळ!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी तुळजापूर नगरी सज्ज झाली असून, या काळात होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने धार्मिक विधींच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. भाविकांना सुलभ, सुरक्षित व सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी चरणतीर्थ आणि सकाळच्या पूजेच्या घाटाच्या वेळेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

​असे असेल धार्मिक विधींचे नवे वेळापत्रक-
​९ व १० ऑक्टोबर, १२ ते २१ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर २०२६:
​चरणतीर्थ- पहाटे १:०० वाजता
​सकाळची पूजा घाट- सकाळी ६:०० वाजता
​विशेष दिवस (११ ऑक्टोबर – घटस्थापना व २६ ऑक्टोबर – मंदिर पौर्णिमा):
​चरणतीर्थ- मध्यरात्री १२:०५ वाजता
​सकाळची पूजा घाट: सकाळी ६:०० वाजता

​मंदिर प्रशासनाचे आवाहन-
​नवरात्र महोत्सवात देशभरातून लाखो भाविक तुळजापुरात दाखल होतात. दर्शनाची रांग सुरळीत राहावी आणि धार्मिक विधी वेळेत पार पडावेत यासाठी हे नियोजनबद्ध बदल करण्यात आले आहेत.

​”सर्व महंत, पुजारी, सेवेधारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी या बदललेल्या वेळेची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे.” माया माने (तहसीलदार तथा व्यवस्थापक-प्रशासन, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india