Best News Portal Development Company In India

जिद्द अन् चिकाटीनेच यश निश्चित! जळकोट येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन; ३९ संघांचा थरार!

जिद्द अन् चिकाटीनेच यश निश्चित! जळकोट येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन; ३९ संघांचा थरार!
​
तुळजापूर प्रतिनिधी:-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि धाराशिव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील जळकोट येथील कुलस्वामिनी आश्रम शाळेत आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
​या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी मोठा प्रतिसाद नोंदवला.

यामध्ये १४ वर्षे वयोगटातील १७ संघ, १७ वर्षे वयोगटातील १६ संघ आणि १९ वर्षे वयोगटातील ६ संघ असे एकूण ३९ संघ सहभागी झाले होते.
​उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड म्हणाले की, “खेळामुळे केवळ शारीरिक विकास होत नाही, तर संघभावना आणि शिस्त निर्माण होते. विद्यार्थ्यांनी आयुष्यात जिद्द आणि चिकाटी ठेवली की यश निश्चित मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा मैदानी खेळांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे.”

​याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील, माजी सरपंच गजेंद्र पाटील, तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार, प्रयाग मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष सचिन कदम, डॉ. संजय कदम, प्राचार्य संतोष चव्हाण, मुख्याध्यापक विनायक राठोड, मुख्याध्यापक ए. जी. पवार, माजी सरपंच ज्योतिका चव्हाण आणि पंडित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
​सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कोकाटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार किरण कांबळे यांनी मानले.

​स्पर्धा व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नागेंद्र गुरव, देवानंद पांढरे, बिळेणसिध्द् हक्के, दुर्गेश कदम, किरण ढोले, साबळे सर, राठोड सर, मुखम सर, एस. एन. दुधभाते, के. बी. कारले, के. बी. लवंद, पी. एस. कुंचगे, अमित खारे यांच्यासह आश्रम शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india