Best News Portal Development Company In India

१६ खेडी पाणीपुरवठा योजना त्वरीत कार्यान्वीत करावी – प्रा सुरेश बिराजदार!

१६ खेडी पाणीपुरवठा योजना त्वरीत कार्यान्वीत करावी – प्रा सुरेश बिराजदार
– – – – – – – – –
१ कोटी १० लक्ष रू नवीन विद्युत जोडणीसाठी त्वरीत भरण्याची केली मागणी.

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

मागील अनेक वर्षा पासून जलजिवण मिशन अंतर्गत १६ गावांसाठी १४० कोटी रू आसपास खर्च करून पूर्ण करण्यात आलेली नवीन पाणीपुरवठा योजना कधी थकित वीज बिलाच्या कचाट्यातून सुटते न सुटते तर परत नवीन विद्युत कनेक्शन जोडणीसाठी महावितरणला भरावयाच्या १ कोटी १० लक्ष रू च्या रक्कमेमुळे कार्यान्वित होण्यापासून थांबली आहे . अशा दुष्काळी परिस्थितीतही योजना पूर्ण असूनही परत विद्युत कनेक्शन नसल्याने “धरण उशाला कोरड घशाला ” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .

ही योजना कार्यान्वीत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा .सुरेशदाजी बिराजदार यांनी धाराशिव येथे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची (दि . ८ )भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली असुन श्री पुजार यांनी योजना त्वरित कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले आहे .

तर महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता हेमंत नागदे,निवासी उपजिल्हाधिकारी श्री कडवकर यांच्यासमवेत महावितरणचे मुख्य अभियंता श्री . बुलबुले , कार्यकारी अभियंता श्री काळे यांच्यासह अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीत पाण्याची निकड पाहता शासन विद्युत जोडणीची रक्कम भरेपर्यन्त विद्युत जोडणी ची कामे चालू करावी व पाणीपुरवठा चालू करावा अशी मागणी श्री बिराजदार यांनी केली आहे .शिवाय वरिष्ठ पातळीवर याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले .

उमरगा लोहारा तालुक्यातील भोसगा , जेवळी ,माकणी सालेगाव सास्तुर,तावशीगड ,बलसुर , एकुरगा ,कलदेव लिंबाळा ,माडज ,नारंगवाडी ,जवळगा बेट , नाईचाकूर ,पेठसांगवी , या १६ गावानां यांचा थेट फायदा होणार आहे . भीषण टंचाईच्या परिस्थितीत काही गावांना टँकरला पाणी मिळण्याची अडचण ओळखून माकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून टँकर साठी आउटलेटचे प्रयत्न चालू आहे .

१६ खेडी योजना सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार असून आवश्यक असलेल्या छोट्या मोठ्या कामांची तयारी केली आहे .१ कोटी १० लक्ष रुपयाचा निधी मंजूर असून बजेट उपलब्ध नसल्याने विलंब होत असल्याचे महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता श्री नागदे यांनी श्री बिराजदार यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले आहे .

निवासी उपजिल्हाधिकारी श्री कडवकर यांच्या समवेत श्री बिराजदार यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता तथा मुख्य अभियंता यांच्याशी चर्चा करून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी लागणाऱ्या विद्युत जोडणी साठी एक कोटी दहा लक्ष रुपयाचा निधी मंजूर असून शासन साधारण महिनाभरात सदरील निधी उपलब्ध करणार आहे .

तोपर्यंत दुष्काळी परिस्थितीमुळे अत्यावश्यक असलेल्या पाणीपुरवठ्यासाठी विद्युत जोडणी द्यावी व योजना त्वरित कार्यान्वित करावी अशी विनंती अधिकाऱ्यांना केली आहे .यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे .
मागील काही वर्षापासून योजना पूर्णत्वास येऊनही विविध शासकीय नियमांमध्ये अडकून योजना सुरू होण्यास विलंब होत आहे .
उमरगा लोहारा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे . विद्युत जोडणीसाठी एक कोटी दहा लक्ष रुपये निधी उपलब्ध नसल्याने योजना कार्यान्वित होण्यास विलंब होत आहे .

जेणेकरून १६ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने महावितरण ने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता त्वरित विद्युत जोडणी देऊन ही योजना कार्यान्वित करावी . अशी मागणी श्री बिराजदार यांनी केली आहे .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india