Best News Portal Development Company In India

नळदुर्ग येथिल पॅंथर चा छावा काळाच्या पडद्याआड : सिद्धांत (सोनू) बनसोडे यांचे दुःखद निधन

नळदुर्ग येथिल पॅंथर चा छावा काळाच्या पडद्याआड : सिद्धांत (सोनू) बनसोडे यांचे दुःखद निधन
———————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):

आंबेडकरी चळवळीतील पॅंथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दुशांत बनसोडे रा. नळदुर्ग ता.तुळजापूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव सिद्धांत बाबासाहेब बनसोडे उर्फ सोनू यांचे दि.०८ऑक्टोबर २o२६ रोजी रात्री ठिक १० वा.सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एक पॅंथरचा छवा काळाच्या पडद्याआड झाला आहे. ही एक अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद अशी घटना आहे.

सोनू हा नळदुर्ग आणि परिसरातील युवकांचा एक आधारस्तंभ होता.तर नळदुर्ग येथील बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांचे पुतणे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.बनसोडे कुटंबाचा एक आधारवड कोसळला आहे.त्यांच्या पश्चात आई, वडिल,पत्नी दोन चुलते,चुलत्या भावंडे आत्या असा मोठा परिवार आहे.

दि.०९ आक्टेबर २०२६ रोजी दुपारी ठिक १.०० वा. दरम्यान नळदुर्ग येथे बौद्ध धम्मा पध्दतीने त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात आला.
.
सोनू यांच्या दुःखद निधना बदल रिपाइं (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजा भाऊ ओव्हाळ, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे,जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, भारतिय बौध्द महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम सह सर्व पक्षिय कार्यकर्ते, नेते, युवा कार्यकर्ते महिला, सह नगरवासियानी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली
अंत्यविधी दि.९ ऑक्टोबर २o२६ रोजी दुपारी ठिक १.०० वा. दरम्यान नळदुर्ग येथील स्मशानभूमीत करण्यात आला

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india