Best News Portal Development Company In India

तुळजापूर पालिकेच्या विना नोटीस अतिक्रमण कारवाईवर आरपीआय आक्रमक; “अतिक्रमण काढा, पण रोजीरोटी हिरावू नका!”

तुळजापूर पालिकेच्या विना नोटीस अतिक्रमण कारवाईवर आरपीआय आक्रमक; “अतिक्रमण काढा, पण रोजीरोटी हिरावू नका!”

​तुळजापूर प्रतिनिधी:-
कोणतीही अधिकृत किंवा लिखित नोटीस न देता थेट अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देणाऱ्या तुळजापूर नगरपालिकेच्या कारभारावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आक्रमक झाली आहे. या अनपेक्षित प्रकारानंतर आरपीआयच्या प्रमुख नेत्यांनी तुळजापूर शहराध्यक्षांची भेट घेऊन प्रशासकीय भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
​
​नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आरपीआयचे तुळजापूर शहराध्यक्ष वैजनाथ पांडागळे यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा शाश्वत नोटीस न देता थेट अतिक्रमण हटवण्याबाबत सांगितले. या पार्श्वभूमीवर पक्षाचे जनरल सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे आणि जिल्हा युवक अध्यक्ष रंजीत बनसोडे यांनी पांडागळे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून पाठिंबा दर्शवला.

​यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांनी पालिका प्रशासनाच्या या कारवाईविरोधात आक्रमक भूमिका घेताना स्थानिक व्यावसायिकांच्या हक्कांची मांडणी केली.
​उपजीविकेचे रक्षण: नगरपालिकेने नियमानुसार अतिक्रमणे जरूर काढावीत, परंतु स्थानिक लहान व्यावसायिक आणि विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा व उपजीविकेचा प्राधान्याने विचार केला पाहिजे.

​मित्रपक्षाचा आठव: भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राज्यात व स्थानिक पातळीवर मित्रपक्ष आहेत. त्यामुळे प्रशासनाने किंवा नगरपालिकेने अशा प्रकारची एकतर्फी कारवाई करण्यापूर्वी योग्य तो समन्वय साधून गांभीर्याने विचार करायला हवा.
​कोणतीही कायदेशीर नोटीस न देता केवळ सूचना देऊन भीतीचे वातावरण निर्माण करण्याऐवजी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक मार्ग काढावा, अशी मागणी यावेळी आरपीआय नेत्यांनी केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india