Best News Portal Development Company In India

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडून श्री तुळजाभवानी मंदिर परिसराची पाहणी!

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडून श्री तुळजाभवानी मंदिर परिसराची पाहणी!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर नगरीत येणाऱ्या भाविक-भक्तांना सुलभ, सुलभ आणि सुरक्षित दर्शन घेता यावे यासाठी लोकप्रिय आमदार मा. श्री. राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांनी मंदिर परिसर, भवानी रोड तसेच दर्शन मंडप भागाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

​या पाहणी दरम्यान प्रशासकीय अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. (भा.ज.पा.) शहराध्यक्ष आनंद (दादा) कंदले यांनी आमदार साहेबांना भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांबद्दल व सुविधांची सविस्तर माहिती दिली.

​नवरात्रोत्सव हा श्रद्धा, भक्ति आणि शक्तीच्या उपासनेचा पवित्र उत्सव असल्याने संपूर्ण उत्सवकाळात दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी आणि भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना आमदार साहेबांनी दिल्या.

​”आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो! कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माते की जय!”

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india