Best News Portal Development Company In India

​’आई राजा उदो उदो!’: श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमयात प्रारंभ; पारंपरिक विधींनी घटस्थापना संपन्न!

​’आई राजा उदो उदो!’: श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमयात प्रारंभ; पारंपरिक विधींनी घटस्थापना संपन्न!

​तुळजापूर प्रतिनिधी- लहू घोडके
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आज अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात सुरुवात झाली आहे.
​आज पहाटे मातेची सिंहासनावर मोठ्या श्रद्धेने प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर दुपारी १२ वाजता पारंपरिक धार्मिक विधी आणि
मंत्रोच्चारांच्या गजरात घटस्थापना संपन्न झाली.

​पुढील नऊ दिवस संपूर्ण तुळजापूर नगरी आईच्या भक्तीत, श्रद्धेत आणि उत्साहात न्हाऊन निघणार आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तिच्या चरणी नतमस्तक होताना मन:शांती आणि नवी ऊर्जा मिळो तसेच मातेच्या कृपेचा आशीर्वाद प्रत्येक कुटुंबावर सदैव राहो, हीच प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

​मान्यवरांची उपस्थिती-
या घटस्थापना प्रसंगी श्री तुळजाभवानी मातेचे महंत, मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, सौम्य्याश्री पुजार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अर्चना पाटील, मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, तुळजापूरचे नगराध्यक्ष श्री विनोद ( पिटुभैया )गंगणे , धाराशिव जिल्हा माहिती कार्यालय अधिकारी श्री विवेक खडसे (dio) , विद्यमान नगरसेवक श्री रामचंद्र(आबा) रोचकरी , व इतर मान्यवर यांच्यासह पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india