नळदुर्ग बस स्थानकातील मुक्कामी असलेल्या एसटी बसच्या पाठीमागील बाजूच्या काचा अज्ञात इसमाने फोडल्या : नळदुर्ग बसस्थानक रात्रीच्यावेळी असुरक्षित चौवीस तास वहातुक नियंत्रकाची गरज
————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
दि.१३ ऑक्टोबर २o२६
रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने नळदुर्ग ता.तुळजापूर येथिल बस स्थानकात मुक्कामी असलेल्या एका बसच्या पाठीमागील बाजूस
दगडफेक करून काचा फोडल्याची चिंता जनक घटना घडलीआहे.त्यामुळे प्रवाशी वर्गात भितीचे वातावर निर्माण झाले असून रात्रीच्या सुमारास हे बसस्थानक असुरक्षित असल्यामुळे या ठिकाणी २४ तास वाहतूक नियंत्रकाची व पोलीस चौकीची गरज असल्याचे प्रवासी नागरिकातून मागणी होत आहे
. याबाबत मिळालेली माहिती अशी की तुळजापूर आगाराची बस दुपारी ठिक १.३० वा. दरम्यान आपल्या नियमित फेऱ्या करण्यासाठी तुळजापूर अगारातून नळदुर्ग बस स्थानकात येथे व नळदुर्ग येथून दिवसभर पुढील फेऱ्या या नळदुर्ग ते अक्कलकोट करून शेवटी ती बस नळदुर्ग येथे बस स्थानकात मुक्कामी थांबते. आणि सकाळी ठिक ७.०० वाजता नळदुर्ग ते अक्कलकोट फेरी पूर्ण करून ती बस तुळजापूर अगारात जाते .
असा प्रकारे फेऱ्या करण्यासाठी दि.१२ ऑक्टोबर २०२६ रोजी एसटी बस क्रमांक MH20 BL2708 ही बस दुपारी १.३० वा. दरम्यान तुळजापूर आगारातून नळदुर्ग बस स्थानकात आली. येथून आपल्या नियमित नळदुर्ग ते अक्कलकोट फेऱ्या पूर्ण करून नळदुर्ग बसस्थानकात मुक्कामी आली असता दि.१३ ऑक्टोबर च्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात इसमाने नळदुर्ग येथे मुक्कामी असलेल्या त्या बसच्या पाठीमागील बाजूस दगड मारून काच फोडली.या बस स्थानकात रोज संध्याकाळी ठिक १०.०० वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रक असतात. त्या नंतर वाहतूक नियंत्रकाची ड्युटी संपते.त्या नंतर हे बस स्थानक बेवारस होते.या ठिकाणी काही दारुडे वगैरे स्टॅन्ड मध्ये असतात.उशिरा येणाऱ्या प्रवाशांची लुटमार करण्याच्या हेतूने चोरटेही कधीकधी फिरकतात असी चर्चा आहे.
त्यामुळे येथे रात्री दहाच्या नंतर सुरक्षितता नसते.हे बस स्थानक मुंबई – हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर बसलेले असून जवळ पास ६५ गावांच्या केंद्रस्थानी आहे.
या बस स्थानकावरून रात्रीच्य सुमारास लांब पल्याच्या .२o ते २२ बस गाड्या ये जा करतात असे समजते.परंतु येथे २४ तास वहातूक नियंत्रक नसल्याने नोंद न करता जातात.
हा राष्ट्रीय महामार्ग सध्या नळदुर्ग ला बाय पास करण्यात आलेला आहे. त्यामुळे नळदुर्ग बस स्थानकात रात्री १०.०० वाजल्या नंतर वहातुक नियंत्रक नसल्याने रात्रीच्या लांब पल्याच्या गाडीने नळदुर्ग ला येणाऱ्या प्रवाशाना बाय पास रोडवर गोलाईत किंवा खंडोबा मंदिरा जवळ सोडून बस पुढे निघून जाते.
त्या ठिकाणा वरुन प्रवाशांन नळदुर्ग बसस्थानकात किंवा शहात आपल्या घरी जाण्यासाठी सुविधा नाही. रिक्षा आलीच तर.जादा भाडे देवून प्रवाशांना जावे लागते. त्यामुळे नाहक प्रवाशांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.एवढ करून ही प्रवाशी रात्री बे रात्री नळदुर्ग बस स्थाथकात आलेच तर बस स्थानक ही सुरक्षित नाही.रात्री येथे वहातूक नियंत्र नसतात, नळदुर्ग बस स्थानक पोलीस चौकी म्हणजे असून खोळंबा नसून तोटा म्हटल्या प्रमाणे आहे. येथे पोलीस कॉन्स्टेबलही नसतात.यामुळे नळदुर्ग बस स्थानकात रात्रीच्या सुमारास प्रवाशी थांबने त्यातल्या त्यात महिला प्रवाशी थांबने जोखमीचे आहे.
काच फोडलेल्या एसटी बसचा पोलीस पंचनामा होईल,अज्ञात इसमावर गुन्हा दाखल होईल,बस तुळजापूर अगारात जमा होईल, तिची दुरुस्ती होईल आणि पुन्हा ती बस रोडवर धावेल पण नळदुर्ग बस स्थानकातील रात्री ठिक १०.०० वा. नंतर रात्रीच्या सुमाराची परिस्थिती कसी बदलणार, सुरक्षततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार असे अनेक प्रश्न उभे राहतात.
यावर एक उपाय म्हणून नळदुर्ग बस स्थानकात २४ तास वाहतूक नियंत्रकाची सोय करावी म्हणजे रात्रीच्या सुमारास ये .जा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस ह्या बसस्थानकातून जातील. त्याचबरोबर नळदुर्ग बस स्थानक पोलीस चौकीत कायमस्वरूपी पोलीस कॉन्स्टेबलची सोय करावी रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी जनतेतून होत आहे.





