तानाजी कदम एक लढवय्ये पॅंथर : दि.१६ ऑक्टोबर त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने आभिष्ठचिंतन!
————————————————-
♦️ भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रभर तालुका जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी निर्माण झाले आहेत .आज ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारता मंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणारे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्रात आहे.त्यात धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील तानाजी कदम यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
तानाजी कदम यांनी अगदी लहान वयापासूनच आंबेडकरी चळवळीशी जोडले गेले.त्याच्या ऐन उमेदीच्या काळात महाराष्ट्रामध्ये नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली दलित पॅंथरचा एक झंजावात सुरू झाला.शहरी झोपडपट्टी भागा बरोबरच महाराष्ट्रातील तमाम गाव खेडी वाडी वस्ती मध्ये दलित पॅंथरच्या शाखा निर्माण होऊ लागल्या उपेक्षित बहुजनांवर प्रस्थापित्याकडून होणाऱ्या अन्न अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम दलित पॅंथरच्या माध्यमातून चालू होतं.त्यातच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या नामांतराचा लढा सुरू झाला तब्बल १४ वर्षे चाललेल्या या नामांतराच्या लढाईमध्ये महाराष्ट्रातील अनेक तरुण आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली सामील झाले. यातूनच महाराष्ट्रात एक मोठ्या प्रमाणात दलित समाजाचे मोठे संघटन उभे राहिले त्यात मास लिडर म्हणून रामदास आठवले साहेब हे संबध देशभरात चर्चेला आले आणि अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा नामविस्ताराने आंबेडकरी अनुयायांच्या अस्मितेची नामांतराची लढाई लढाईला यश आलं या एकूणच चळवळीमध्ये तुळजापूर तालुक्यातून अनेक कार्यकर्ते पुढे आले आणि आपल नेतृत्व नेतृत्व विकसित केले.त्यात तानाजी कदम यानी एक लढवय पॅंथर म्हणून आपली ओळख निर्माण केली.
तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ दलित पॅंथरच्या शाखा स्थापण करण्यामध्ये तानाजीचा फार मोठा वाटा आहे. दलित पॅंथरच सन १९८९ ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील खुल्या पत्रावर आधारित स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये विलगीकरण करण्यात आले त्याच वेळेस गावागावातील तमाम पॅंथरच्या शाखा ह्या रिपब्लिकन पक्षात विलीनीकरण करण्यात आल्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून तानाजी कदम यांचं नेतृत्व पुढे आलं.तानाजी कदम यांनी आपल्या सर्व नेत्यांची कार्यकर्त्यांची समन्वय साधत तुळजापूर तालुका पिंजून काढला आणि गावागावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा निर्माण झाल्या यामध्ये आनंद, पांडागळे,दुर्वास बनसोडे प्रमोद कांबळे, दिवंगत दयानंद बनसोडे,बाबासाहेब बनसोडे असे कितीतरी नावे सांगता येतील या कार्यकर्त्यानी सामाजिक जाणीव ठेवून आंबेडकर चळवळीमध्ये काम करत होते करत आहेत. या सर्वांचा योग्य तो सन्मान करत तानाजीने आजतागायत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक वेगळ अस्तित्व निर्माण केल. पक्षाच्या वेळोवेळी होणाऱ्या आदेशाचे पालन करत तुळजापूर तालुक्यात गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी अनेक मोर्चे आंदोलने केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा तुळजापूर शहरात असलेला अर्धाकरी पुतळ्याच्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी सातत्याने आंदोलने उपोषण करून पाठपुरावा केला.या सर्वच आंदोलनामध्ये इतर सर्व कार्यकर्ते नेते यांच्या बरोबरच तानाजी कदम यांचे योगदान फार मोठे आहे.
तसेच हडको तुळजापूर येथे दोन मजली बौद्ध विहार उभारण्या मध्ये तानाजी कदम यांचा हिंहाचा वाटा आहे.
आपल्या सर्व कार्यकर्त्यां समवेत राजाभाऊ ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सतत पाठपुरावा केल्याने शेवटी तुळजापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. अशी कितीतरी प्रसंग,कितीतरी उदाहरणे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलने सांगता येतील असा एक लढवायला पॅंथर म्हणून आज ते सर्वत्र परिस्थिती आहेत.
आपल्या या सामाजिक राजकीय धम्म चळवळीत तानाजी कदम हे प्रत्यक्ष जरी नगरसेवक होऊ शकले नसले तरी त्यांच्या सहकार्याने त्यांच्या अर्ध्यागिनी वैशाली तानाजी कदम ह्या पाच वर्ष नगरसेवक म्हणून जनतेची सेवा केली यात या कामी आपल्या पत्नी च्या पाठीमागे खंबीरपणे समर्थ साथ देत तानाजी कदम यांनी वैशालीताई यांचे नेतृत्व पुढे आणलं आहे. दि.१६ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा…!
एस. के. गायकवाड
मु.पो. वागदरी ता. तुळजापूर
(लेखक रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते आहेत)





