Best News Portal Development Company In India

तुळजापूरमध्ये खळबळ! गावठी कट्टा बाळगणाऱ्या चौघांवर शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल; इनोव्हा कारसह मुद्देमाल जप्त!

तुळजापूरमध्ये खळबळ! गावठी कट्टा बाळगणाऱ्या चौघांवर शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल; इनोव्हा कारसह मुद्देमाल जप्त!

तुळजापूर प्रतिनिधी :-
तुळजापूर ते धाराशिव रोडवरील तुळजाई टायर्स दुकानासमोर लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा बेकायदेशीर अग्निशस्त्रासह (गावठी कट्टा) फिरणाऱ्या चौघा जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत गावठी कट्ट्यासह एक रिकामी पुंगळी आणि गुन्ह्यात वापरलेली सुमारे दोन लाख वीस हजार रुपये किमतीची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे.

​घटनेचा घटनाक्रम व तपशील-
​घटनेची वेळ व दिनांक: १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३:३० वाजता.
​ठिकाण: तुळजाई टायर्स दुकानासमोर, तुळजापूर ते धाराशिव रोड, तुळजापूर.
​आरोपींची नावे:
​आशिष अरुण गोटे (रा. रुई, ढोकी, ता. जि. धाराशिव)
​धनंजय प्रकाश जाधव (रा. रुई, ढोकी, ता. जि. धाराशिव)
​सुशांत सपाटे (रा. तुळजापूर)
​इतर एक इसम (नाव निष्पन्न होणे बाकी)
​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: गावठी कट्टा, एक पिवळ्या धातूची रिकामी पुंगळी आणि टोयोटा कंपनीची इनोव्हा कार (अंदाजे किंमत २,२०,००० रुपये).

​पोलिसांची कारवाई-
​तुळजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुरज शिवाजी चांदणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा कलम ३ आणि २५ अन्वये संबंधित आरोपींवविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail