श्री माधवराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांनी साजर
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि १५) रोजी श्री माधवराव पाटील महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा केंद्र आणि माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार हे होते.
चौकट : याप्रसंगी सेवानिवृत्त प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी ‘वाचन संस्कृती आणि आजचा युवक’ या विषयावर मार्गदर्शन केले. वाचनामुळे वैचारिक भूमिका व दृष्टिकोन बदलून सुजाण नागरिक घडतो, असे प्रतिपादन करताना आज आपण मंत्रयुगातून यंत्रयुगात आणि आता तंत्रयुगात वावरत आहोत. इंटरनेट व मोबाईलमुळे संपूर्ण जग मुठीत आले असले, तरी तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे पुस्तके व वृत्तपत्रांचे वाचन रोडावले आहे. यामुळे युवकांचा शब्दसंग्रह कमी होत असून भाषण व शब्दरचनेवर परिणाम होत आहे. वाचन हे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे आणि बुद्धीला समृद्ध करणारे प्रभावी साधन असल्याचे सांगत.
वाचनाने शब्दसंग्रह वाढून संभाषण कौशल्य सुधारते आणि नवनवीन विषयांची माहिती मिळते. चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने ताण कमी होऊन एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. वाचनामुळे विश्लेषणात्मक विचारशक्ती आणि कल्पकतेला नवी दिशा मिळते. सुजाण नागरिक घडवण्यासाठी युवकांनी पुस्तकांच्या वाचनाची सवय कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
यावेळी आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. राम बजगिरे, विस्तार सेवा केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे, राष्ट्रीय योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुजित मठकरी, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. सुशील मठपती, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. शीला स्वामी, डॉ. सुभाष हुलपल्ले, विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा डॉ. संध्या डांगे, डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. किरणसिंग राजपूत, डॉ. प्रकाश कुलकर्णी, प्रा. अशोक बावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग दोन तास सामुदायिक वाचनाचा आनंद घेतला.
विज्ञान मंडळाच्या वतीने भिंती पत्रकाचे व मंडळाचे उद्घाटन प्रा. राजकुमार रोहीकर यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान मंडळाच्या कार्यकारिणीत वैष्णवी दुळगे, रागिनी डिग्गे, ओम उद्धव पोतदार, रोहण पवार, लिंबांना शेळके, प्रगती शिरोळे व अंजली कांबळे या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संध्या डांगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश आडे तर डॉ. जयश्री सोमवंशी यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित विज्ञान मंडळाच्या भिंती पत्रकाचे उद्घाटन करताना चंद्रकांत बिराजदार, राजकुमार रोहीकर, संध्या डांगे व अन्






