Best News Portal Development Company In India

*गुरूवाडी येथे भारतीय बौध्द महासभा शाखा क्र. २० चे उदघाटन*

*गुरूवाडी येथे भारतीय बौध्द महासभा शाखा क्र. २० चे उदघाटन*

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

दि.१४ रोजी उमरगा तालुक्यातील गुरूवाडी येथे भारतीय बौध्द महासभा शाखा क्र. २० ची स्थापना दि. ५ आक्टोबर २०२६ रोजी दुपारी भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे याच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसएफ २५ मिशन अंतर्गत ५६ ग्राम शाखा स्थापन करण्यात साठी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उमरगा यांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक २० ची स्थापना करण्यात आली. या वेळी भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे, तालुका सरचिटणीस सगीता सोनकाबळे तालुका उपाध्यक्ष प्रा. शिवराम आडसुळे, तालुका सचिव धिरज काबळे, हिशोबतपासनिस शिवाजी जाधव याच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गुरूवाडी येथे शाखेची स्थापना करण्यात आली.

या वेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक २० चे शाखाध्यक्ष कांचन गायकवाड, सरचिटणीस अंजली गायकवाड, कोषाध्यक्ष सविता गायकवाड, उपाध्यक्ष संस्कार विभाग अरुणा गायकवाड, उपाध्यक्ष महिला विभाग आम्रपाली गायकवाड, उपाध्यक्ष पर्यटन विभाग शालन बाई गायकवाड, उपाध्यक्ष संरक्षण विभाग वनिता गायकवाड, संस्कार सचिव कांताबाई गायकवाड, महिला सचिव उषाबाई गायकवाड, संरक्षण सचिव रोहिणी गायकवाड, पर्यटन सचिव रेणुका गायकवाड, संस्कार सचिव प्रथमेश गायकवाड, महिला सचिव उमाबाई गायकवाड पर्यटन सचिव रोहित गायकवाड, संरक्षण सचिव मुकेश गायकवाड, संघटक नागनाथ गायकवाड, संघटक कल्लेशदादा गायकवाड, संघटक साखरचंद गायकवाड, संघटक व्यंकट गायकवाड, संघटक नटराज गायकवाड, संघटक राजश्री सूर्यवंशी, संघटक प्रवीण गायकवाड, संघटक हौसाबाई गायकवाड यावेळी सर्व बौद्ध उपासक उपासिका लहान थोर मंडळी यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती.

भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे काम करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे त्याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत असं समजत असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी गायकवाड यांनी केली तर आभार कांचन गायकवाड यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail