Best News Portal Development Company In India

नळदुर्ग, व वागदरी परिसरात वेळ अमावस्या (येळवस) हा सण उत्साहात तुळजाई एक्सप्रेस चे पत्रकार नळदुर्ग (एस . के .गायकवाड) यांनी सहकुटुंब साजरा केला.

नळदुर्ग,वागदरी व परिसरात वेळ अमावस्या (येळवस) हा सण उत्साहात साजरा
—————————————————–
नळदुर्ग ( एस.के. गायकवाड ) :
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, वागदरी व परिसरात वेळा आमवस्या हा सण कृषी उत्सव म्हणून मोठ्या आनंदी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
वेळ अमावस्या किंवा येळवस हा सण महाराष्ट्रातील विशेषता मराठवाड्यात मोठ्या आनंदाने शेतकरी उत्सव म्हणून साजरा केला जातो. वेळ अमावस्या हा सण कृषी उत्सव म्हणून ही साजरा केला जातो.या दिवशी शेतकरी कुटुंबासोबत जाऊन जमीनीचे पूजन करून सामूहिकरित्या कौटुंबिक वनभोजनाचा आनंद घेतात.
या सणा निमित्ताने सर्व भाजीपाला मिळून केलेली भाजी तिला भज्जी म्हणतात,तर बाजरीच्या पिठाचे उंडे बनवले जातात आणि ताक लसणाची पात,लसूण वगैरे मिक्स करून आंबील (मठ्ठा ) बनवले जाते. हा मठठा मातीच्या माठात ( छोट्या घागरीत) शेतकरी सकाळीच डोक्यावर घेवून शेताकडे. जातो.या सणातील हा विशेष पदार्थ म्हणून ओळखला जातो.,उंडे,भज्जी,अंबिल, गव्हाची खिर, सेंगदानेच्या पोळ्या, वरन भात, वांगें बटाटे ची घट्ट भाजी, गाजराची भाजी, हलवा, चपाती असे वेगवेगळे पदार्थ बनविले जाते.
शेत जमीनीची पारंपारिक पद्धतीने पूजा करून शेतकरी कुटूंबातील सर्व सदस्य,निमंत्रित पाहुणे, मित्र मंडळी एकत्रित सहभोजन करून एक प्रकरे वन भोजनाचा आनंद घेतात. या दिवसी सबंध शेतशिवार माणसाने गजबजून जाते.
या वर्षी दि.१९ डिसेंबर २o२५ रोजी आनंददायी वेळा आमवस्या हा सण नळदुर्ग,वागदरी व परिसरात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india