*डॉ.अर्चना गंगावणे-भाले यांना पीएचडी पदवी प्रदान*
_________________________
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
उमरगा येथील आदर्श महाविद्यालययातून मराठी विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठातून डॉ.अर्चना गंगावणे – भाले यानी पीएच.डी.पदवी प्राप्त केली आहे.
डॉ. अर्चना गंगावणे – भाले यानी “ माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर लिहीलेल्या निवडक गीतांचा विवेचक अभ्यास” या विषयावर शोध निबंध लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथे सादर केला.त्यानी हे संशोधन प्रा.डॉ.प्रभाकर कांबळे , आदर्श महाविदयालय उमरगा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले .
माता रमाई आंबेडकर यांचं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील स्थान त्यागी आणि भर भक्कम समर्थक असे होते. म्हणूनच महामाता रमाईला त्यागमूर्ती म्हटले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक विद्वत्तेमागे रमाईचा अथांग त्याग आणि मुक सोशिकता हेच खरे बळ होते.त्या केवळ पत्नी नव्हत्या. तर दलित स्त्रियांसाठी प्रेरणास्थान होत्या.त्यांच्यामुळेच बाबासाहेब देशाला संविधान देऊ शकले. या अनुषंगाने त्यांच्यावर आतापर्यंत लिहिल्या गेलेल्या आणि प्रकाशित झालेल्या काही निवडक गीतांचा आणि अप्रकाशित/ उपेक्षित राहिलेल्या रमाईवरील गीतांचा परामर्श या प्रस्तुत संशोधनामध्ये करण्यात आलेला आहे. आणि एका स्त्रीचे म्हणजे त्यागमूर्ती रमाईचे डॉ बाबासाहेबाच्या जडणघडणीमध्ये कसे योगदान आहे हे महत्त्व विषद केलेले आहे.
या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार व मार्गदर्शकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.






