Best News Portal Development Company In India

भीम कन्या साक्षी नळदुर्गकर, नळदुर्ग नगरपरिषदेच्या च्या सर्वात तरुण नगरसेविका

.भीम कन्या साक्षी नळदुर्गकर या नळदुर्ग नगर परिषदेच्या सर्वात तरुण नगरसेविका.
———————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिष सार्वत्रिक निवडणुक २o२५ प्रभाग १० मधून विजय झालेल्या भिम कन्या साक्षी किशोर नळदुर्गकर ह्या नळदुर्ग नगर परिषदेच्या सर्वात तरुण महिला नगरसेविका ठरला असून त्यांनी विजय संपादन करून आपल्या राजकीय जीवनाची यशस्वी सुरुवात केल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नुकताच पार पडलेल्या नळदुर्ग नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती महिला करिता राखीव असलेल्या प्रभाग १० अ मधून कुमारी साक्षी किशोर नळदुर्ग यांनी भाजपा व मित्रपक्ष महायुतीतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीचा निकाल दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी लागला असून त्यात त्यांनी घवघवीत विजय संपादन केला असून त्या नळदुर्ग नगर परिषदेच्या सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून गणल्याअसून त्यांच्या या विजया बद्दलप्र कार्यकर्त्यानी आनंदोत्सव साजरा केला.
कुमारी साक्षी किशोर नळदुर्गकर घ्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असून त्यांना घरातूनच सामाजिक राजकीय आंबेडकरी चळवळीचे बाळकडू मिळालेले आहे.त्यांचे वडील किशोर नळदुर्गकर माजी नगरसेवक आहेत तर त्यांचे आजोबा दिवंगत पँथर दयानंद आप्पाराव बनसोडे हे सलग दोन-तीन वेळा या नगरीचे नगरसेवक म्हणून काम केलेले असून दरम्याच्या काळात त्यांनी नळदुर्ग नगर परिषदेच्या विविध विभागाचे सभापती म्हणून सुद्धा काम पाहिलेले होते.तसेच त्यांच्या आजी विमलबाई शुक्राचार्य बनसोडे ह्या देखील माजी नगर सेविका आहेत. साक्षी नळदुर्गकर यानी कमी वयात आपल्या राजकीय जिवनाची यशस्वी सुरुवात केल्या बद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सह सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india