Best News Portal Development Company In India

तुळजापूर करांचा विश्वासच माझी खरी शक्ती-नुतन नगराध्यक्ष विनोद गंगणे!

तुळजापूरकरांचा विश्वासच माझी खरी शक्ती – नुतन नगरध्यक्ष विनोद गंगणे !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूरच्या प्रत्येक नागरिकाने माझ्यावर टाकलेला विश्वास, दिलेले आशीर्वाद आणि दाखवलेले प्रेम हे केवळ निवडणुकीतील यश नाही, तर आयुष्यभर जपायची मोठी जबाबदारी आहे,अशा शब्दांत नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी तुळजापूरकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.जनतेच्या प्रेमातून मिळालेल्या या संधीचे सोनं करण्याचा निर्धार व्यक्त करताना ते म्हणाले की,ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने पार पाडेन. तुळजापूरच्या विकासासाठी प्रत्येक घटकाला सोबत घेऊन, समतेवर आधारित, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा माझा ठाम संकल्प आहे.
आपल्या अपेक्षांवर खरे उतरून, आपल्या विश्वासाला मान देत तुळजापूरला अधिक सक्षम, स्वच्छ आणि विकसित शहर बनवणे हेच माझे ध्येय आहे. जनतेने दिलेला हा मान मी सेवेतूनच फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन,अशी ग्वाहीही त्यांनी तुळजापूरनामा न्यूजशी बोलताना सांगितलं दिली.
शेवटी,पुन्हा एकदा सर्व तुळजापूरकरांचे मनःपूर्वक आभार. तुमचे प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे,अशा भावनिक शब्दांत विनोद गंगणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india