मधूकर शेळकेंचा मास्टरस्ट्रोक! विनोद गंगण्यांचा दणदणीत विजय;आरोपांचे राजकारण चुराडा
शेळके–गंगणे जोडीचा धमाका! तुळजापूरच्या राजकारणात भाजपचा पुन्हा एकदा ‘दबदबा’
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषदेचा राजकीय ‘गड’ पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे कायम राहिला असून,नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विनोद विलासराव गंगणे यांनी १७७० मतांच्या निर्णायक फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप, टीका आणि अफवांचे राजकारण निकालानंतर पूर्णतः हवेतच विरल्याचे स्पष्ट झाले आहे.या विजयामागे भाजपच्या संघटनात्मक ताकदीसोबतच मधूकर शेळके यांची खंबीर साथ निर्णायक ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पडद्यामागून शांतपणे पण ठाम भूमिका घेत, शेळके यांनी कार्यकर्त्यांना एकत्र ठेवत विजयासाठी महत्त्वाची रणनीती आखली. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी अनुभवाच्या जोरावर योग्य दिशा दिल्याने भाजपचा विजय अधिक भक्कम झाला, अशी प्रतिक्रिया पक्षांतर्गत वर्तुळात उमटत आहे.मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत आघाडी कायम ठेवत गंगणे यांनी विजयाकडे ठाम वाटचाल केली. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली.“तुळजापूरच्या विकासासाठी जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला,” अशी प्रतिक्रिया विनोद गंगणे यांनी दिली.दरम्यान, निवडणुकीपूर्वी केलेले आरोप, प्रशासनावर दबावाचे दावे आणि नकारात्मक प्रचाराला जनतेने पूर्णपणे नाकारल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. मधूकर शेळके यांच्या संयमी पण प्रभावी भूमिकेमुळे भाजपने तुळजापूरमध्ये आपले वर्चस्व कायम राखत राजकीय ताकद पुन्हा सिद्ध केली आहे.






