Best News Portal Development Company In India

तुळजापूरचा “गड” पुन्हा भाजपकडे!१७७० मतांनी विनोद गंगणे यांचा दणदणीत विजय, विरोधकांचे आरोप हवेतच विरले.

तुळजापूरचा”गड”पुन्हा भाजपाकडे!१७७० मतांनी विनोद गंगणे यांचा दणदणीत विजय; विरोधकांचे आरोप हवेतच विरले

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच तुळजापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक काळात झालेली प्रचंड टीका, आरोप-प्रत्यारोप, वादग्रस्त मुद्दे आणि विरोधकांचा आक्रमक प्रचार यांना झुगारून देत भारतीय जनता पार्टीने तुळजापुरात आपला राजकीय दबदबा कायम राखल्याचे स्पष्ट केले आहे.भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी तब्बल १,७७० मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला आहे. या निकालाने भाजपाचा तुळजापूरमधील “राजकीय गड”अजूनही अभेद्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.निवडणूक प्रचारादरम्यान विविध आरोप, टीकास्त्र आणि वाद निर्माण करण्याचे प्रयत्न झाले; मात्र विकासाचा मुद्दा, संघटनशक्ती आणि मतदारांचा ठाम विश्वास भाजपाच्या पाठीशी उभा राहिल्याने अखेर विजयाचा झेंडा फडकला.या निकालानंतर तुळजापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, विरोधी गोटात मात्र निराशेचे वातावरण पसरले आहे. “तुळजापूर भाजपाचाच” हा नारा मतदारांनी पुन्हा एकदा मतपेटीतून ठामपणे अधोरेखित केला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india