Best News Portal Development Company In India

जनतेची सेवा आणि न .पा.अंतर्गत असणाऱ्या शासकीय योजना लाभार्थींना मिळवून देणे हेच माझे जीवन कार्य राहील; नूतन नगराध्यक्ष मारुती खारवे

नळदुर्ग महाविदयालयात जल जिवन मिशन यावर व्याख्यान
——————————————————
नळदुर्ग ( एस.के. गायकवाड) कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालय नळदुर्ग येथील NCC विभागामार्फत आज जल उत्सव कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुभाष राठोड होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून ग्रीन क्लब समन्वयक डॉ. उद्धव भाले होते.दि.२२ ते २८ डिसेंबर दरम्यान संपूर्ण भारतात जल उत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमात”जल जिवन मिशन” या विषयावर डॉ. उद्धव भाले यांनी पाणी अनुभवावरून प्रत्येक व्यक्ती दररोज पाणी बचत मोठया प्रमाणात करू शकतो या संदर्भात आकडेवारीचे सादरीकरण करून स्पष्ट केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी अध्यक्षीय समारोप करतांना प्रत्येकांनी आज पाण्याच्या बचत केली नाही तर येणाऱ्या काळात पाण्यासाठी महायुद्ध होईल असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, अधिक्षक धनजंय पाटिल, नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके, प्रा. बी डी. गायकवाड, डॉ. जयश्री घोडके, प्रा.सज्जन देव्हारे,डॉ.दिपक जगदाळे, प्रा.कठारे सर , प्रा. बरडे सर , उमेश सर्जे यांच्यासह शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ४o एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन एनसीसी विभागप्रमुख लेप्टनंट डॉ.अतिश तिडके यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india