Best News Portal Development Company In India

भाजप नगरसेवक समरजितसिंह ठाकूर यांचा सत्कार, हा सत्कार देवीच्या आशीर्वादाप्रमाणे आहे-समरजीत सिंह ठाकुर

भाजपा नगरसेवक समरजीतसिंह ठाकुर यांचा सत्कार

हा सत्कार तुळजाभवानी देवीचा आशीर्वादाप्रमाणे आहे _ नगरसेवक समरजीत सिंह ठाकुर

तुळजापूर दि २४ प्रतिनिधी

तुळजापूर येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या हा सत्कार मला तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाप्रमाणे आहे, राजकीय क्षेत्रामध्ये चांगले काम करण्यासाठी आपण आपल्या पदाचा उपयोग करू असे उद्गार नवनिर्वाचित नगरसेवक समरजीतसिंह ठाकुर यांनी काढले.

परंडा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक समरजीतसिंह सुजितसिंह ठाकुर यांचा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले व ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तुळजापूर शहराची माजी सरचिटणीस उमेश गवते, संस्कार भारतीचे प्रदेश सह महामंत्री डॉ. सतीश महामुनी यांनी याप्रसंगी नगरसेवक समरजीत सिंह ठाकुर यांचा शाल फेटा तुळजाभवानीची प्रतिमा पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन सत्कार केला.

परंडा हे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांचे कार्यक्षेत्र आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील काळात परंडा शहराची सेवा करण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मला मिळाली आहे आपण त्याचा योग्य उपयोग करून असे देखील याप्रसंगी नगरसेवक ठाकूर यांनी सांगितले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india