*धाराशिव जिल्हा*
*धाराशिव जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने संघर्षनायक मा.ना.डॉ.रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*
*केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक आदरणीय मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस धाराशिव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून केक कापून व मोतीचूर्ण लाडू वाटप करून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला तसेच धाराशिव शहरातील महिला रुग्णालय येथे फळे वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे महिला रुग्णालय च्या अधीक्षक सौ गवळी मॅडम, सौ गिरजा मॅडम सौ फारसे मॅडम कुंभार सर जिल्हा उपाध्यक्ष रंजीत गायकवाड जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ ओहाळ जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड जिल्हा सचिव लखन ओव्हाळ तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे संदिपान कांबळे युवक शहराध्यक्ष सूर्यनंद बनसोडे कौडगाव चे उपसरपंच मारुती अंकुशराव चोकोबा शिरसट संदीप अंकुशराव समाधान सरवदे अजय इंगळे रवी कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते*







