Best News Portal Development Company In India

सरकारी घंटागाडी ला मध्यरात्री आग; अज्ञातांचा धुमाकूळ-सिंदफळ ग्रामपंचायतीचे ६० हजारांचे नुकसान

सरकारी घंटागाडीला मध्यरात्री आग; अज्ञातांचा धुमाकूळ – ग्रामपंचायत मालमत्तेचे ६० हजारांचे नुकसान!

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर तालुळ्यात सिंदफळ गावात अज्ञात समाजकंटकांनी उच्छाद मांडत ग्रामपंचायतीच्या सरकारी घंटागाडीला मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे १२.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत शेजारी उभी असलेली सरकारी घंटागाडी (क्र. एमएच २५ एजे ५३४४) अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. या जाळपोळीत सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी मनोज उत्तम चौगुले (वय ४३), ग्रामपंचायत अधिकारी, सिंदफळ यांनी दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्याफिर्यावरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सरकारी मालमत्तेवर थेट हल्ला झाल्याने गावात खळबळ उडाली असून, मध्यरात्रीची वेळ साधत केलेल्या या कृत्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. अज्ञात आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india