Best News Portal Development Company In India

आई तुळजाभवानीची ऊर्जा, सबका साथ सबका विकास, विकासाचा ध्यास! लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांचा आज पदग्रहण सोहळा

आई तुळजाभवानीची ऊर्जा, विकासाचा ध्यास!

लोकनियुक्त विनोद उर्फ पिटू गंगणे यांचा नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा सोमवारी

तुळजापूर | प्रतिनिधी

आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या अमाप विश्वासातून नगराध्यक्षपदी विराजमान झालेले लोकनियुक्त विनोद उर्फ पिटू गंगणे यांचा नूतन नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा सोमवार,दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून शुभ आशीर्वाद द्यावेत,असे आवाहन नवनिर्वाचित नगराध्यक्ष गंगणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.पत्रकारांशी संवाद साधताना गंगणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि तुळजापूर शहरातील जनतेच्या आशीर्वादामुळे मला नगराध्यक्षपद मिळाले आहे. ही केवळ पदाची नाही,तर जनतेच्या सेवेसाठी मिळालेली जबाबदारी आहे.

▪️महंतांचा आशीर्वाद, आमदारांची उपस्थिती

या पदग्रहण सोहळ्यास श्री तुळजाभवानी मातेचे महंत श्री तुकोजीबुवा,वाकोजीबुवा सर्व महंत,अध्यात्मिक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या पावन आशीर्वादाने पदग्रहण करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक-नगरसेविका,भाजपा पदाधिकारी तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

▪️चुका दुरुस्त करून तुळजापूरचा कायापालट!

पूर्वी झालेल्या चुका दुरुस्त करून तुळजापूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करू. तीर्थक्षेत्र तुळजापूरचा कायापालट हा शब्द नव्हे,तर कृतीतून दाखवू,अशी ठाम ग्वाही गंगणे यांनी दिली.
विकासाचा अजेंडा घेऊनच आम्ही निवडणूक लढलो असून आजपासून खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून देत आहे.असे त्यांनी ठणकावून सांगितले.

▪️मान्यवरांची उपस्थिती

या पत्रकार परिषद व्यसपीठावर माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सज्जन साळुंके,आनंद कंदले,लखन पेंदे,आनंद सावंत,पंडितराव जगदाळे, विशाल छत्रे,विजय कंदले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रास्ताविक विशाल रोचकरी यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेश अमृतराव यांनी मानले.

▪️शेवटी आवाहन

आई तुळजाभवानीची ऊर्जा आणि जनतेचा विश्वास हीच माझी ताकद आहे.मित्रपरिवार, नागरिकांनी पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहून आम्हास शुभाशीर्वाद द्यावेत,असे आवाहन नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india