lनळदुर्ग शहरातील नगर परिषदचे स्वीकृत सदस्य म्हणून रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांना संधी द्यावी
———————————————
प्रभाग १० हाच ठरला भाजप विजयाचा खरा शिलेदार यामुळेच रिपाइंला संधी उपलब्ध करून द्यावी
———————————————-
नळदुर्ग (एस.के गायकवाड):
नुकत्याच झालेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ सन्माननीय नगराध्यक्ष तथा नगरसेवक आणि नगरसेविका या पदासाठी खूप मोठ्या प्रमाणात चुरशीची लढत नळदुर्ग शहरात पाहायला मिळाली पुर्वी पासुनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीचे गट बंधन झाले असून गेली अनेक वर्षापासून महायुतीमध्ये पक्ष एकनिष्ठ म्हणून कार्यरत गेल्या ४० वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा ना रामदासजी आठवले यांचे ते निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक म्हणून बाबासाहेब दुष्यंत बनसोडे यांची खाती आहे त्यांचे वडील दुष्यंत चंद्राप्पा बनसोडे हे मुळचे राजकारणी आहेत हे घरांना दुष्यंत चंद्राप्पा बनसोडे हे रिपाइं च्या हत्ती चिन्हावर निवडणूक लढविली आणि १५ वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे त्यांचे पुत्र रिपाइं पक्षाची एकनिष्ठ राहात रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दुष्यंत बनसोडे यांना नळदुर्ग येथील नगर परिषद मध्ये भाजपाच्या कोट्यातून स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात यावी आशा प्रकारची मागणी शहरांमध्ये जोर धरत आहे .
नळदुर्ग शहराच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच भाजपाला सत्ता मिळवण्याची संधी मिळाली आहे ही संधी फक्त प्रभाग १० अनु सुचित जाती प्रवर्ग व मतदारामुळे मिळाली आहे आणि प्रभाग १० मधल्या मतदारा मुळेच भाजप विजयाचा शिलेदार ठरला आहे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांना स्वीकृत सदस्य म्हणून नगर परिषद सभागृहात पाठवावे आशा प्रकारची मागणी जोर धरत आहे.अन्यथा अगामी होऊ घातलेल्या जिं.प.प.स. निवडनुकित रिपाइं (आठवले) पक्षाला वेगळा विचार करावा लागेल.






