नळदुर्ग बसस्थानक येथे दिव्यांग प्रवाशा करिता रॅम्पच्या कडेला लोखंडी अँगलचे ग्रील बसवा : रिपाइं (आठवले) ची मागणी
————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
मुंबई-सोलापूर- नळदुर्ग ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथे असलेल्या बसस्थानकात दिव्यांग प्रवासाची सोय म्हणून रॅम्प (उतार)बनवले आहे परंतु आधारासाठी त्या रॅमच्या कडेला लोखंडी अँगल चे ग्रील नसल्यामुळे दिव्यांगाना बस स्थानकात ये जा करणे जोखमीचे होत आहे.तेव्हा नळदुर्ग बसस्थानक येथे असलेल्या रॅम्पच्या कडेला लोखंडी अँगल चे ग्रील आधारासाठी बसवावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने संबंधित तुळजापूर आगाराचे आगार प्रमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तुळजापूर आगार प्रमुख यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की नळदुर्ग येथील बस स्थानक हे अत्यंत महत्त्वाचे असून ग्रामीण भागातील गावांच्या केंद्रस्थानी आहे. या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती साठी बस स्थानकात ये जा करण्यासाठी रॅम्प (उतार ) बनविण्यात आला आहे. परंतु त्या रॅम्पमच्याकडेला लोखंडी ग्रीलचा आधार नसल्यामुळे त्यावरून ये जा करताना दिव्यांग प्रवाशांचा तोल जाऊन ते पडण्याची शक्यता आहे.तेंव्हा आधारासाठी त्यांन रॅम्पच्या कडेला लोखंडी ग्रील बसवणे ही काळाची गरज आहे.ही गरज लक्षात घेऊन संबंधित आगार प्रमुख व वरिष्ठाधिकाऱ्यानी नळदुर्ग बस स्थानकात रॅम्पच्या कडेला लोखंडी अँगेलचे ग्रील बसवून दिव्यांग प्रवासासाठी बस स्थानकात बिंदासपणे ये जा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
अगार प्रमुखाचे प्रतिनिधी म्हणून नळदुर्ग बसस्थानक येथील वाहतूक नियंत्रक महेश डूकरे यांनी निवेदन स्वीकारले असून रिपाइं (आठवले) च्या वतीने दिलेल्या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस के गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,आरपीआय अल्पसंख्याक अघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिदभाई कुरेशी, रिपाइंनळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे रिपाइं लोहारा तालुका उपाध्यक्ष गजेंद्र डावरे,दिव्यांग कार्यकर्ते उत्तम गायकवाड, खयूम शेख, विलास कोरे, अकाश गायकवाड, किरण गायकवाड सह कार्यकर्त्यांच्या सह्या अहेत .






