Best News Portal Development Company In India

अवैद्य गुटका व पान मसाला वाहतूक करणाऱ्यावर तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई ९.९६ लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

अवैध गुटखा व पानमसाला वाहतूक करणाऱ्यांवर तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई ९.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

तामलवाडी : ज्ञानेश्वर गवळी

सोलापूरकडून तुळजापूरच्या दिशेने अवैध गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर तामलवाडी पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत जवळपास ९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर येथून तुळजापूरकडे इननोव्हा कार (क्र. MH 13 AX 1738) मधून अवैध माल वाहतूक होत असल्याची माहिती तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने तात्काळ सापळा रचत सदर वाहनाचा पाठलाग केला.
रात्री सुमारे १ वाजता मोडर्न हायस्कूलसमोर कार अडवून तपासणी करण्यात आली.
कारमध्ये दोन इसम आढळून आले. चौकशीअंती त्यांनी आपली नावे इब्राहीम सलीम शेख (रा. बेगम पेठ, सोलापूर) व
सोहेल अहमद कुरेशी (रा. सिध्देश्वर पेठ, सोलापूर)
अशी सांगितली.पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विमल, सुगंधी सुपारी व तंबाखूचे एकूण ४० पोते (विमलचे २० व अन्य २०) मिळून आले. या मुद्देमालाची किंमत सुमारे ५ लाख ९६ हजार रुपये असून वाहनासह एकूण ९ लाख ९६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, पोलीस अंमलदार उमेश माने, तुराब शेख, सुरज नरवडे, दिनकर तोगे, जुबेर काझी, मिथुन गायकवाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.या घटनेमुळे परिसरात अवैध गुटखा व पानमसाला विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india