सगुना गायकवाड यांचे दुःखद
निधन
—————————————————-
नळदुर्ग (प्रतिनिधी ):
शिरपूर तालुका तुळजापूर येथील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा प्रा.राजु गायकवाड यांचे वडील सगुना मारुती गायकवाड यांचे वर्धापकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतच दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या दुःखद निधनाबद्दल घेण्यात आलेल्या शोक सभेत श्रध्दांजली वहाताना प्रा.सत्यवान भोवाळ म्हणाले की दिवंगत सगुना गायकवाड दाजी यानी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वकष्ठावर त्यांनी आपल्या दोन मुलं आणि पाच मुलींना लहानाचं मोठं करून त्यांचा त्यांचा संसार उभा केला प्रा.राजू गायकवाड सारखा सामाजिक जाणीव असलेल्या कार्यकर्त्या तयार केला त्यांच्या दुसरे चिरंजीव गायकवाड याना देखील एम.ए. इंग्लिश बी.एड.पर्यंत शिक्षण देवून त्याना उच्चशिक्षित केल. या प्रसंगी ज्ञानदीप विद्यालय तुरोरी ता.उमरगा चे उप मुख्याध्यापक टी एस माणिकवार, रिपाइं (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव एस.के. गायकवाड सह विविध पक्ष व संघानेच्या कार्यकर्त्यानी त्याना श्रध्दांजली वाहिली.






