नळदुर्ग मैलारपूर खंडोबा यात्रेनिमित्त राष्ट्रीय महामार्गा वरिल अवजड वाहन वाहतुकीत बदल करण्याचे पोलीस प्रशासनाचे निर्देश
—————————————————-
नळदुर्ग (एस.के. गायकवाड ):
दरवर्षीप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मैलारपूर खंडोबा यात्रा दि.२जानेवारी २०२६ पासून सुरुवात होत असून दि.३जानेवारीला मोठ्या प्रमाणात खंडोबाची यात्रा भरते आहे. या यात्रेनिमित्ताने जवळपास तीन ते चार लाख भावीक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात.या देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाना अडथळा येऊ नये म्हणून खंडोबा मंदिराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरून होणाऱ्या अवजड वहान वाहतूकीत तात्पुरता दोन दिवसासाठी बदल करण्यात येत असल्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम यांनी दिले आहे.
तुळजापूर तालुक्यात महाराष्ट्राचे अराध्यदैवत म्हणून ओळखले जाणारे नळदुर्ग मैलारपूर येथे असलेल्या श्री खंडोबा मंदिराची रात्रा
मोठ्या प्रमाणात भरते.या ठिकाणी श्री खंडोबा आणि भानूबाईचा विवाह झाल्याचे सांगीतले जाते. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातील भावीक भक्त लाखोच्या संखेने येथे दर्शनासाठी येतात. या वर्षी दि.३जानेवारीला ही यात्रा भरत असून जवळ पास ३ ते ४ लाख भावीक या यात्रेला येणार असल्याचा अंदाज आहे. या खंडोबा मंदिर पासून नव्याने मुंबई सोलापूर नळदुर्ग मार्गे हैदराबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ बायपास करण्यात आला असून तो खंडोबा मंदिराच्या जवळून जातो खंडोबा मंदिराकडे येणाऱ्या भावीकाना हा रोड ओलांडून देवदर्शनासाठी यावे लागते. जवळपास तीन ते चार लाख भाविकांची गर्दी या मंदिर परिसरात जमते तेंव्हा या राष्ट्रीय महामार्गावर होणारी अवजड वाहतूक ही भाविकांना अडथळा निर्माण करणारी असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मिळाल्याने धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम यांनी दि.o२ जानेवारी ते o४ जानेवारी दरम्यान या रोडवरील अवजड वाहन वाहतुकीत बदल करण्याचे निर्देश दिले असून ही वाहतूक सोलापूर व तुळजापूर वरून हैदराबाद कडे जाणारी वाहने ही नळदुर्ग येथील उड्डाण पुलावरून सर्विस रोडने वळून नळदुर्ग शहरातून मुर्टा पाटी मार्गे पुढे हैद्राबाद कडे जातील.या उलट हैदाबाद कडून येणारी वहाने ही मुर्टा पाटीपासून वळून नळदुर्ग शहरातून पुढे उड्डान पूल सर्विस रोडमार्गे पुढे सोलापूर तुळजापूर कडे जातील असे पोलीस प्रशासनाकडून निर्देशित करण्यात आहे.







