Best News Portal Development Company In India

अभिजीत आपटे यांची आमदार सुनील शेळके यांच्याकडे: स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी

*अभिजीत आपटे यांची आमदार सुनील शेळके यांच्या कडे स्विकृत नगरसेवक पदाची मागणी*
तळेगाव दाभाडे : अभिजीत आपटे यांचा पत्रकारितेत नावलौकिक आहे. अभिजीत आपटे यांनी संपूर्ण मावळ तालुक्यातील ग्रामीण भागासाठी 1000 उद्योगांचा प्रकल्प तयार केला असून मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील आण्णा शेळके यांच्यासमोर प्रकल्प मांडलेला आहे आणि गेल्या एक वर्षापासून अभिजीत आपटे हे आमदारांच्या फॉलोअप मध्ये आहेत प्रतीक्षेत आहेत. अभिजीत आपटे यांचा समाजकार्यामध्ये नेहमी पुढाकार असतो माहिती अधिकार च्या माध्यमातून अनेक मुद्दे अभिजीत आपटे हे उचलत असतात.
अभिजीत आपटे हे गो नी दांडेकर व सहदेव मखामले यांनी स्थापन केलेल्या साहित्य कला आणि संस्कृती मंडळाचे आजीव सभासद आहेत. अभिजीत आपटे हे चित्रपट कथा लेखक समाजवादी विचारवंत राजकीय विश्लेषक लघुपट कलाकार असून त्यांचे वर्तमानपत्रातील लेख आणि लिखाण हे माहितीपर आणि ज्ञानात भर घालणारे असतात अभ्यासपूर्ण असतात विषयाला धरून असतात कायदेशीर दृष्ट्या योग्य असतात त्याच पद्धतीने त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अमृता आपटे भंडारी यांचा सुद्धा समाजकार्यामध्ये पुढाकार असतो लहानग्या मुलींवर अत्याचार प्रकरणांमध्ये अमृता आपटे यांनी मोठा लढा यापूर्वी व्हायला होता. वडगाव मावळ येथे आंदोलन आणि मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये वडगावच्या त्यावेळच्या सरपंच उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे संतोष भेगडे यांनी सुद्धा त्यावेळेला मदत केली होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नऊ दिवस आमरण उपोषण केलं होतं त्यावेळेला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर या स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांसह आल्या होत्या आणि पाठिंबा दिला होता. गरजू रुग्ण असो, गरजू विद्यार्थी असो, ज्येष्ठ नागरिक असो प्रत्येकाला हे कुटुंब आजपर्यंत मदत करत आलेला आहे. अभिजीत आपटे यांनी 2014 मावळ लोकसभा लढवली असून त्यांच्या पत्नी अमृता आपटे भंडारी यांनी 2019 मावळ लोकसभा लढवलेली आहे त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या 2024 मावळ विधानसभेमध्ये देखील त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अभिजीत आपटे हे राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागचे प्रदेश उपाध्यक्ष असून नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे प्रदेशाध्यक्ष रामदासजी मोरे यांनी सहकार सेलच्या प्रदेश संघटक पदी नियुक्तीची घोषणा केलेली आहे. मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके तसेच त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांना अभिजीत आपटे यांनी अमृता आपटे भंडारी यांच्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक पदासाठी मागणी केलेली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india