Best News Portal Development Company In India

खुणाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची सश्रम कारावासाची व दंडाची शिक्षा

खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची सश्रम कारावासाची व दंडाची शिक्षा

भूम | प्रतिनिधी

कोंबड्या चोरीच्या संशयावरून झालेल्या वादातून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची सश्रम कारावासाची व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा भुम येथील अतिरीक्त सत्र न्यायाधीश मा. श्री. बी. जी. धर्माधिकारी यांनी गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी सुनावली.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी श्याम जालिंदर भोसले (रा. मौजे ईट, ता. भूम, जि. धाराशिव) याने विधीसंघर्ष बालक सोन्या उर्फ अमित अश्रुबा पवार याच्याशी संगनमत करून मयत गारवा जाहिरात्या भोसले याचा कुऱ्हाडीने वार करून खून केला होता.आमच्या राखणीच्या क्षेत्रातील कोंबड्या का चोरल्या आणि पुन्हा चोरी केली तर पकडून देऊ,असे मयताने जाब विचारल्याचा आरोपीच्या मनात राग धरून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०५/२०२२ अन्वये भादंवि कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्री. एस. एस. दळवे यांनी केला, तर दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी मा. न्यायालयात सादर केले.
प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग झाल्यानंतर सत्र खटला क्रमांक ४९/२०२२ शासन विरुद्ध श्याम भोसले अशी सुनावणी अतिरीक्त सत्र न्यायालय, भूम येथे पार पडली. या खटल्यात सरकार पक्षाकडून एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही फिर्यादी, इतर साक्षीदारांचे जबाब तसेच परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत मा. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता ॲड. किरण डी.कोळपे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.तसेच पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस फौजदार बाजीराव बळे यांनी काम पाहिले. अखेर मा. न्यायालयाने आरोपीस कलम ३०२ भादंवि अन्वये जन्मठेपेची सश्रम कारावासाची व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india