Best News Portal Development Company In India

नळदुर्ग मैलारपूर श्री खंडोबा यात्रेत लाखो भावी भक्तांचा पिवळा जनसागर उसळला; खोबरं व भंडाऱ्याची उधळण करत लाखोच्या संख्येने भाविक भक्त मंदिर परिसरात दाखल, भक्तांचा लोंढा चालूच..

नळदुग मैलारपूर श्री खंडोबा यात्रेत लाखो भावी भक्तांचा पिवळा जन सागर उसळला : खोबरं व भंडाऱ्याची उधळण करत लाखोच्या संख्येने भाविक भक्त मंदिर परिसरात दाखल भक्तांचा लोंढा चालूच…
——————————————————–
नळदुर्ग (एस.के. गायकवाड):
मुंबई सोलापूर मार्गे हैदराबादला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर बसलेल्या ऐतिहासिक मैलारपूर नळदुर्ग येथील श्री खंडोबा मंदिराची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरली असून श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आणि आपले नवस फेडण्यासाठी भंडारा व खोबऱ्याची उधळण करत मानाच्या काट्या घेऊन लाखोच्या संख्येने भावीक भक्त नळदुर्ग मैलारपूर येथिल श्री खंडोबा मंदिर परिसरात दाखल झाले असून या ठिकाणी भाविक भक्तांचा पिवळा जनसागर उसळ आहे.
पौर्णिमेच्या दिवशी दि.२ जानेवारी २o२६ रोजी नळदुर्ग येथील श्री खंडोबा देवस्थानच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून श्री खंडोबा मंदिर परिसरात श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी व आपापल्या परीने आपले नवस फेडण्यासाठी दि.३ जानेवारी रोजी लाखोच्या संख्येने भाविक भक्त दाखल झाले असून दि.४ जानेवारी रोजी रात्री ठिक १ ते २ वा. दरम्यान अंणदूर व नळदुर्ग येथील मानाच्या काट्यासह परिसरातून गावागावातून आलेल्या मानाच्या काट्यासह लाखो भाविक भक्तांच्या उपस्थित खोबर व भंडारा उधळत यळकोट यळकोट जय मल्हार चा गरज करत शोभेची दारु उडवत फटाक्याची अतिषबाजी करत मानाच्या काट्या नाचवित
भव्य आणि दिव्य असा शबिना (मिरवणूक) निघणार आहे. यात्रेसाठी महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून व कर्नाटकासह परराज्यातून श्री खंडोबा देवाचे भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात.धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला असून नगरपरिषद प्रशासनही भाविक भक्तांच्या साठी अनेक सोयी उपलब्ध करून दिलेला आहोत.
यात्रे निमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तुळजापूर आगार प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग बस स्थानक येथून भाविक भक्तांना यात्रेत येण्या जाण्यासाठी महामंडळाच्या जादा एसटी बसची विशेष सोय करण्यात आलेल आहे
यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटीच्या वतीने दि.४ जानेवारीला दुपारी ठिक ४.००वा.दरम्यान जंगी कुस्त्यांचे आयोजन करत्यात आले असून महाराष्ट्रातून नामवंत पैलवान या कुस्तीमध्ये सहभाग घेणार आहेत. एकंदरीत श्री खंडोबा मंदिराची यात्रा मोठ्या उत्साहाने येळकोट येळकोट जय मल्हार चा गजरात उत्साही वातावरणान संपन्न होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india