ह.भ.प कीर्तनकार कु.शिवलीला पाटील यांचे तुळजाभवानी मातेस विधिवत देवदर्शन
तुळजापूर | प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दि.३ जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प कीर्तनकार कुमारी शिवलीला पाटील यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी भक्तिभावाने हजेरी लावली. यावेळी देवीचे विधिवत देवदर्शन करत साडी-चोळी अर्पण करून मानसन्मानासह पूजा करण्यात आली.देवदर्शनप्रसंगी मंदिरातील पारंपरिक विधी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडले. तुळजाभवानी मातेचे पुजारी प्रवीण नरहरी कदम यांनी वैदिक मंत्रोच्चारात पूजा विधी संपन्न केला.आई तुळजाभवानीच्या दर्शनाने मन प्रसन्न झाल्याची भावना कुमारी शिवलीला पाटील यांनी व्यक्त केली. या मंगलप्रसंगी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवास येत होते.






