Best News Portal Development Company In India

भीम नगर नळदुर्ग येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

भीम नगर नळदुर्ग येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
——————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड): तुळजापूर तालुक्यातील भीम नगर नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची १९५ वी जयंती मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.यू.शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑज इंडिया (आठवले ) चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के. गायकवावाड, सामाजिक कार्यकर्ते अनंत बनसोडे हे होतों. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना एस.के. गायकवाड म्हणाले की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण चळवळीमुळेच या देशातील स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली त्यामुळेच आज महिला सर्व क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला ‘खांदा लावून काम करत असताना दिसतआहेत.महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीला संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी घटनात्मक अधिकार मिळवून दिला आहे त्यामुळे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा आदर्श समोर ठेवून शिक्षण घेऊन प्रत्येकाने आपली सर्वांगीण प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा. याप्रसंगी अनंत बनसोडे यांचेही शुभेच्छा पर भाषण झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन येथील सहशिक्षिका सुलक्षणा टिळक यांनी केले. यावेळी पालक सुनिता सावंत, आम्रपाली कांबळे,संध्या कांबळे, सुजाता कांबळे,नानिमा रोंगे, रूपाली सोनवणे,कुशालबाई बनसोडे विद्यार्थी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india