Best News Portal Development Company In India

शेतकऱ्याची चोरीस गेलेली गाभण म्हैस स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही दिवसात हस्तगत

शेतकऱ्याची चोरीस गेलेली गाभण म्हैस स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही दिवसांत हस्तगत

धाराशिव | प्रतिनिधी

शिराढोण पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली १ लाख ४० हजार रुपये किमतीची दहा महिन्यांची गाभण मुऱ्हा जातीची म्हैस स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी शिताफीने शोधून शेतकऱ्याच्या स्वाधीन केली असून या कारवाईमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी शेतकरी सूर्यकांत धोंडीराम धाकतोडे यांच्या शेतातून सदर म्हैस चोरीस गेली होती. या प्रकरणी पोलीस ठाणे शिराढोण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, दि. ०४ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथक शिराढोण हद्दीत गस्त घालत असताना धाबा पाटी, पारधीपेढी परिसरात एका इसमाला रात्रीच्या अंधारात म्हैस व एक रेडकू घेऊन जाताना आढळून आले. संशय आल्याने चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
अधिक चौकशीसाठी सदर इसम व जनावरांना पोलीस ठाणे शिराढोण येथे आणण्यात आले. सखोल चौकशीनंतर हीच म्हैस चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून १ लाख ४० हजार रुपये किमतीची म्हैस व रेडकू जप्त केली.आरोपी जालिंदर उर्फ पिंटू शंकर शिंदे (रा. ब्रह्मगाव, शेंडी पाटी, ता. वाशी, जि. धाराशिव) याने आपल्या दोन साथीदारांसह सदर म्हैस चोरी केल्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्यास पोलीस ठाणे शिराढोण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्यासह शौकत पठाण ,जावेद काझी,प्रकाश औताडे, फरहान पठाण, चापोहेकॉ. रत्नदीप डोंगरे, नवनाथ गुरव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india