पत्रकारांनी निरपेक्ष व निपक्षपातीपणे न्यायिक भावनेतून पत्रकारिता करावी : नगर सेवक मारुती खारवे
—————————————————-
नळदुर्ग (एस्. के.गायकवाड ):
वृत्तपत्र हे समाजाचा अरसा असून या जाणिवेतूनच मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी सर्वप्रथम “दर्पण” नावाचे मराठी वृत्तपत्र चालवले असून पत्रकाराकडे समाज हा न्यायिक भावनेतून न्याय मिळण्याच्याअपेक्षेने आदराने बघतो तेंव्हा पत्रकारांनी निरपेक्ष व निपक्षपातीपणे पत्रकारिता करावी असे प्रतिपादन नळदुर्ग नगरीचे नूतन नगरसेवक तथा डॉ.आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नळदुर्ग ता. तुळजापूर चे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते मारुती कारवे यांनी येथे बोलताना केले.
दि.६ जानेवारी २०२६ रोजी मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने डॉ.आंबेडकर इंग्लिश मीडियम स्कूल नळदुर्ग येथे मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष तथा राज्य कार्यकारणी सदस्य अरुण लोखंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन नगरसेवक मारुती कारवे हे होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मारुती खारवे बोलत होते तर अध्यक्षिय स्थानावरून बोलताना अरुण लोखंडे म्हणाले की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी प्रामाणिकपणे निष्ठेने व निर्भीडपणे वास्तववादी लेखन करून निष्कलंकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करावा.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने नूतन नगरसेवक मारुती खारवे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तर नगरसेवक मारुती खारवे यांच्या वतीने उपस्थित पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचा पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पत्रकार एस.के.गायकवाड यांनी केले. यावेळी पत्रकार विजय पिसे, ईरफान काझी,संजय पिसे,अकाश अलकुंटे,राहुल कांबळे, विठ्ठल सोनटक्के,पत्रकार मित्र प्रल्हाद भोसले उपस्थित होते.






