Best News Portal Development Company In India

वागदरी जी .प .शाळेस डायस, स्पीकर माईक, घड्याळ, माईक स्टॅन्ड व फुलदाणी भेट देऊन मिटकर कुटुंबांनी केला मुलाचा वाढदिवस साजरा

वागदरीत जि.प.शाळेस डायस, स्पिकरमाईक,घड्याळ,माईक स्टॅन्ड व फुलदानी भेट देवून मिटकर कुटूंबानी केला मुलाचा वाढदिवस साजरा
—————————————————
नळदुर्ग (एस.के. गायकवाड ):
मुलाचा वाढदिवस म्हटले की मित्राला पार्टी वगैरे देऊन केक कापून प्रसंगी महागडा डीजे लावून वाढदिवस साजरा केला जातो.परंतु असा कसलाही डामडौल न करता वागदरी ता.तुळजापूर येथील सुज्ञ मिटकर कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा वाढदिवस येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस स्पीकरमाईक,डायस,घड्याळ, माईकस्टॅन्ड व फुलदाणी भेट देऊन आपल्या मुलाचा वाढदिवस कुटुंबासह शाळेत साजरा करून एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
दि.०५ जानेवारी २o२५ रोजी वागदरी ता.तुळजापूर
येथिल सौ.संपदा सचिन मिटकर व डॉ.सचिन गणपतराव मिटकर यांचे चिरंजीव ब्रम्हांड सचिन मिटकर यांचा वाढदिवसहोता.आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमत्त येथिल जि.प. शाळेसाठी डायस,घड्याळ, माईक व माईक स्टॅन्ड फुलदाणी या वस्तू भेट देवून चिरंजीव ब्रम्हांडचा वाढदिवस आजी आजोबा,आई वडिल काका सह संपूर्ण कुटूंबासमवेत शालेय विद्यार्थ्या सोबत साजरा केला.
या वेळी गावातील गणपतराव मिटकर,विश्वनाथ मिटकर,रविकांत यादव,नितीन यादव,प्रशांत जाधव,ऋषिकेश सुरवसे,तुकाराम लकडे, किशोर पाटील, सौ.पार्वती बिराजदार, श्रीमती सुषमा मसे मॅडम सौ पद्मीनबाई पवार अंगणवाडी सेविका सौ रूपाली मिटकर अंगणवाडी मदतनीस,नरसूपंत काळे सर,धनाजी अनपट सर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या प्ररुंगी मुख्याध्यापक भरत सगर सर ,डॉ सचिन मिटकर सर ,श्रीमती सुषमा मसे मॅडम रविकांत यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गावातील सर्वांनी असेच पुढे येऊन शाळेसाठी मदत करावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक भरत सगर सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजीलोहार सर यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india