Best News Portal Development Company In India

तुळजापूर ते नळदुर्ग शटल एसटी बस सेवा म्हणजे बे भरवशाची म्हैस: महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष.

तुळजापूर ते नळदुर्ग शटल एसटी बस सेवा म्हणजे भरवशाची म्हैस : महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष
————————————————-
नळदुर्ग (एस.के. गायकवाड):
भरवशाच्या म्हशीचे दूध काढण्यासाठी चरवी (भांडे)घेऊन बसलेल्या मालकाला कधी म्हैस लाथ मारेल आणि भांडयातील दुध सांडेल याचा नेम नसतो त्यामुळे “भरवसाची म्हैस आणि चरवी घेवून बैस” असी म्हण प्रचलित झाली आहे.अगदी याचं म्हणी प्रमाणे धाराश जिल्ह्यातील तुळजापूर आगारातून सुटणाऱ्या तुळजापूर ते नळदुर्ग शटल एसटी बस फेऱ्याची झालेली आहे.
कारण या बस तुळजापूर ते नळदुर्ग किंवा नळदुर्ग ते तुळजापूर ये जा करतान वाटेत कधी बंद पडतील याचा नेम नाही.
तुळजापूर आगारातून दररोज दर अर्ध्या तासाला तुळजापूर ते नळदुर्गआणि नळदुर्ग ते तुळजापूर अशा फेऱ्या मारणाऱ्या शटल बसेस सुरू केल्या आहेत परंतु या बसेस सतत मध्येच बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना नाहक मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या कडे महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.आगारातून बसगाडी सोडतान तपासून सोडली जाते की नाही यात शंका निर्माण होते आहे.
महामंडळाच्या अगारातून बस गाड्या च्या दुरुस्तीचे काम व्यवस्थिती केले जाते की नाही यातही संख्या निर्माण होते. त्यामुळे प्रवासी वर्गातून एसटी महामंडळावर नाराजी व्यक्त केली जात आहे
दि.७ जानेवारी रोजी नळदुर्ग बस स्थानकातून तुळजापूरकडेरुकाळी ठिक ११.४५ वा. दरम्यान निघालेली नळदुर्ग-तुळजापूर बस नळदुर्ग बसस्थानका पासून अवघ्या एक दीड कि.मी.अंतरावर बाय पास हायवे रोडवरील उड्डान पुला जवळ बिघडल्याने प्रवाशांना काही ताडकळत मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. काही प्रवाशांचे तात्काळ कामे खोळंबली त्यामुळे प्रवाशी वर्गातून महामंडळाच्या बेजबाबदार वर्तनावर नाराजी व्यक्त केली.एक तर गाडया कधिच बेळेवर नसतात एखाद्या गाडी बाबत वहातूक नियंत्रकास विचारले असता गाडीचा बरवसा नाही असे चक्क सांगीतले जाते. हात दाखवा गाडी थांबवा हे ब्रिदवाक्य अता कालबाह्य झाले आहे.बसस्थानक अवारात जरी एसटी बसला हात दाखवला तरी गाडी थांबवली जात नाही. एकंदरीत एसटी महामंडळा कडून होणाऱ्या गैर सायी बद्दल प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केले जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india