Best News Portal Development Company In India

धाराशिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची बैठक दि.७-१-२०२६ रोजी दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृह येथे संपन्न.

*प्रेस नोट*
*धाराशिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा बैठक दिनांक 7-1-2026 रोजी दुपारी 2 वाजत शासकिय विश्राम ग्रह येथे संपन्ना झाली.*
सदरील बैठक होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी घेण्यात आली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक मा.राजाभाऊ (दादा) ओव्हाळ साहेब महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. विद्यानंद (दादा)बनसोडे जिल्हाध्यक्ष धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीस प्रमुख उपस्थितीत मराठवाडा कार्याध्यक्ष आनंद पंडागळे मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे मराठवाडा कार्यकारणी सदस्य मा. हरीश जी डावरे मराठा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा मित्र पक्षाकडून सोडून घेण्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले यावेळी राजाभाऊ ओव्हाळ म्हणाले की आठवले साहेबांच्या आदेशाने मित्र पक्षाकडे आपण जागेची मागणी करू होता होईल तेवढ्या जिल्ह्यातील आरक्षित जागा सोडून घेण्याचे आश्वासन दिले आहे. व पक्षात दुफळी निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्याची गय केली जाणार नाही असा इशारा दिला.आर.पी.आय. (आठवले) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागणी केली. तरी विविध विषयावर चर्चा होऊन मागील नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीत मित्र पक्षांनी आर.पी.आय (आठवले) पक्षाला विश्वासात घेतले नाही. तरी कार्यकर्ते नाराज असल्याने यापुढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मित्रपक्षाने विश्वासात घेतले नाही तर आर.पी.आय.(आठवले) पक्ष स्वबळावर लढेल असे सर्वानुमती ठरले आहे. या बैठकीत आठवले पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका निवडणुकीत व इतर पक्ष विरोधी काम केल्याने काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे पाच वर्षासाठी निलंबन करण्याचे सर्वानुमते बैठकीत ठरले आहे. तरी आपणास खालील दिलेल्या व्यक्तींना पाच वर्षासाठी निलंबन करण्याची नोटीस काढत आहोत तरी नोटीस मिळालेल्या तारखेपासून आपण सात दिवसाच्या आत लेखी स्वरूपात प्रदेश अध्यक्ष, प्रदेश जॉइंट सेक्रेटरी व जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर करावे.
१) तानाजी कदम मराठवाडा उपाध्यक्ष तुळजापूर
२) उत्तम भालेराव रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष लोहारा
३) प्रवीण गोरोबा बनसोडे युवा नेते धाराशिव
४) उदयराज बनसोडे शहराध्यक्ष धाराशिव यांचे सात दिवसाच्या आत चारी व्यक्तीचे लेखी स्वरूपात आपले म्हणणे सादर नाही केल्यास पाच वर्षासाठी आपले निलंबन ग्राह्य धरले जाईल याची आपण नोंद घ्यावी.
या बैठकीत मा.मारुती खारवे सर नळदुर्ग शहराध्यक्ष नगरपरिषद नळदुर्ग येथे नगरसेवक झाल्याने यांचा शाल, फेटा,बुके देऊन सत्कार करण्यात आला. पुढील कार्यास सर्वांनी शुभेच्छा दिल्या या बैठकीत सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या बैठकीस मा.प्रताप कदम जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस मा.सिद्धार्थ ओव्हाळ, जिल्हा कार्याध्यक्ष मा.बाबासाहेब मस्के, जिल्हा उपाध्यक्ष मा.संदिपान कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मा.दगडू भोसले उमरगा, तालुका अध्यक्ष धाराशिव मा.भालचंद्र कठारे, तुळजापूर तालुका अध्यक्ष मा.अरुण लोखंडे, लोहारा तालुका अध्यक्ष मा. काकासाहेब भंडारे,महिला आघाडी आशाताई कांबळे उमरगा तालुका अध्यक्ष, उषाताई खंडागळे उमरगा तालुका उपाध्यक्ष, सुमन गायकवाड उमरगा, बालाजी माटे लोहारा, एस. के. गायकवाड जिल्हा सचिव, धम्मशील कदम युवक जिल्हा उपाध्यक्ष, वैजनाथ पांडागळे शहराध्यक्ष तुळजापूर, शुभम कदम तुळजापूर युवक तालुका अध्यक्ष, रंजीत बप्पा गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष, शाहूराज गायकवाड उमरगा, सूर्यानंद बनसोडे युवक शहराध्यक्ष धाराशिव, रोहित बनसोडे, राहुल माळाळे, सौरभ बनसोडे, अमित सोनवणे, श्रीकांत मटकीवाला, लहू घोडके ओ.बी.सी. तालुका अध्यक्ष तुळजापूर या बैठकीस शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india